दाऊद संभाषण प्रकरणी एकनाथ खडसेंना क्लीन चीट
By Admin | Updated: July 18, 2016 17:12 IST2016-07-18T15:39:13+5:302016-07-18T17:12:37+5:30
दाऊद फोनकॉलप्रकणी महाराष्ट्र एटीएसने एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली आहे.

दाऊद संभाषण प्रकरणी एकनाथ खडसेंना क्लीन चीट
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी झालेला फोनकॉल, पीएची लाचखोरी यासह अनेक आरोपांमुळे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडून लाचखोरी प्रकरणात क्लीनचीट मिळाल्यानंतर आता 'दाऊद फोनकॉल'प्रकरणी एटीएसने खडसेंना क्लीन चीट दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यात एसीबीने लाचखोरीप्रकरणात न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून खडसे यांचे नाव वगळण्यात आले होते. त्यात आज एटीएसनेही दाऊद इब्राहिम फोन कॉल प्रकरणात क्लीन चीट दिल्याने खडसेंचा आनंद द्विगुणित झाला आहे. खटसे व दाऊद यांच्या दरम्यान कोणतेही संभाषण झालेले नाही, असे राज्यातील एटीएसने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान आता एटीएस चौकशी अहवाल सायबर सेलकडेही सोपवणार आहे.
आणखी वाचा :