शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसेंनी माझ्याबद्दल खालच्या दर्जाची भाषा वापरली, त्यांना तात्काळ अटक करा - अंजली दमानिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 10:27 IST

भाजपाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना तात्काळ अटक करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  पत्र लिहून दमानिया यांनी कारवाईची मागणी केली आहे.

मुंबई, दि. 6 - भाजपाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना तात्काळ अटक करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  पत्र लिहून दमानिया यांनी कारवाईची मागणी केली आहे. एकनाथ खडसे यांनी जळगावच्या मुक्ताईनगरमधील त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आपल्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, खालच्या दर्जाची भाषा वापरली असा आरोप त्यांनी केला आहे. 

यासंबंधीचा व्हायरल झालेला एक व्हिडीओही त्यांनी पुरावा म्हणून दिला आहे. मंगळवारी दमानिया यांनी जळगाव पोलीस स्थानकात खडसेंविरोधात रीतसर तक्रार दाखल केली व कलम 354 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. 

अंजली दमानिया यांनीच एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांची वेगवेगळी प्रकरणे समोर आणली. त्यामुळे खडसे यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला व त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

खडसेंना सोडणार नाही - अंजली दमानिया एकनाथ खडसेंनी माझ्याबद्दल जी भाषा वापरली त्यामुळे मी प्रचंड व्यथित झाले आहे. खडसेंविरोधात मी तिस-यांदा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत आहे. यावेळी त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर, मी थेट कोर्टात जाईन असे दमानिया यांनी म्हटले आहे. आज मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्याशीही चर्चा करणार आहे. यावेळी खडसेंना आपण सोडणार नाही असे दमानिया यांनी म्हटले आहे. 

खडसे यांचा राजीनामामागच्यावर्षी एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.  आपल्यावरील सर्व आरोप निराधार असून, निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत मी मंत्रिपदापासून दूर होत आहे, असे खडसे यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी लागलीच खडसे यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे सांगत त्यांच्यावरील सर्व आरोपांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाईल, असे टि्वटरवरुन जाहीर केले होते. 

राजीनाम्याची ७ कारणे...- खडसेंचा निकटवर्तीय गजानन पाटील याला ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी झालेली अटक.- भोसरी; पुणे येथील एमआयडीसीचा कोट्यवधी रुपये किमतीचा भूखंड पत्नीच्या नावे खरेदी केला. व्हीसल ब्लोअर हेमंत गवंडे यांनी पुराव्यासह केलेला आरोप आणि पोलिसात दाखल केलेली तक्रार- अंजली दमानिया यांनी कुऱ्हा-बडोदा उपसा सिंचन योजनेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी आज़ाद मैदानावर आरंभिलेले उपोषण- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या घरातून खडसेंच्या मोबाइलवर झालेले कथित कॉल्सचे प्रकरण हॅकर मनिष भंगाळे याने बाहेर काढले.- खडसे यांच्या कार्यालयातील वादग्रस्त अधिकारी वर्ग - मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी अधूनमधून उडणारे खटके - पत्नीला महानंदचे संचालकपद, मुलीकडे जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आणि सूनबाई खासदार. पक्षश्रेष्ठींना ही घराणेशाही खटकली. 

काय आहे कलम 354 स्त्रीच्या मान, सन्मानाचा भंग केल्यास कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल होतो.  

टॅग्स :Crimeगुन्हा