शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार पण कन्या रोहिणी पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार?

By विलास बारी | Updated: April 6, 2024 21:38 IST

एकनाथ खडसे यांनी प्रकृतीचे कारण सांगत लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर त्यांच्या भाजपतील प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला होता.

जळगाव - भाजपत जाण्याचे तूर्तास प्रयोजन नाही, असे सांगणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याचे शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार एकनाथराव खडसे हे खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्ली येथे गेले होते. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची बैठक झाली व अनेक राजकीय विषयांवर त्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी आमदार खडसे यांचा भाजपत प्रवेश झाल्याची चर्चा होती. मात्र, आमदार खडसे यांनी त्याबाबत स्पष्टपणे नकार दिला होता. मात्र, आता त्यांनी स्वत:च भाजपत प्रवेश करीत असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील गौणखनिज प्रकरणी एकनाथ खडसे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना १३७ कोटी रुपयांचा दंड करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी हा निर्णय शासनाने रद्द केला. त्यानंतर भाजपकडून रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध होत असताना आपण राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी जाहीर केले होते. मात्र, रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी घोषित केली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रकृतीचे कारण सांगत लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर त्यांच्या भाजपतील प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला होता.

खडसेंचा प्रवेश..? रोहिणी खडसे मात्र थांबणार राष्ट्रवादीत?एकनाथ खडसेंसोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यादेखील भाजप प्रवेश करणार काय? याबाबत मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रोहिणी खडसे या मुक्ताईनगर विधानसभेसाठी इच्छुक आहेत. पुढचे राजकारण सोयीचे जावे म्हणून राष्ट्रवादीतच राहणार की वडिलांसोबत भाजप प्रवेश करणार हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपतील प्रवेशाची बातमी खरी आहे. लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. अजून प्रवेश झालेला नसल्यामुळे विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. - एकनाथ खडसे, आमदार, राष्ट्रवादी शरद पवार गट

खडसेंचा असा झाला प्रवास...

  • - १९९५-१९९९ युती सरकारच्या काळात मंत्रिपद
  • - २००९ ते २०१४ विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद
  • - जून २०१६ मध्ये भोसरी प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा
  • - २०१९ ला पक्षाने त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खडसे यांना विधानसभेचे तिकीट दिले, रोहिणी खडसेंचा पराभव
  • - २०२० मध्ये पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश
  • - २०२४ मध्ये ४ वर्षांनी पुन्हा स्वगृही परतणार
टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBJPभाजपा