शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

राजकारणात इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना उत्तर, एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 07:41 IST

Eknath Khadse : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाविकास आघाडी सरकारने पाठविलेल्या यादीत खडसे यांचेही नाव होते.

मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने नाकारलेली उमेदवारी, ईडीसह तपास यंत्रणांचा ससेमिरा आणि राज्यपाल नियुक्त सदस्यत्वाची अनिर्णित राहिलेली यादी, एकेकाळी भाजपचे राज्यातील पहिल्या फळीत राहिलेले नेते एकनाथ खडसे अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. जवळपास तीन वर्षानंतर विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांचे राजकीय पुनर्वसन होत आहे.

‘खडसे  इतिहासजमा झाले आहेत म्हणणाऱ्यांना उत्तरे मिळाली’, अशा शब्दात खडसे यांनी गुरुवारी आपल्या भावना व्यक्त केल्या. एकनाथ खडसे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. भाजपने माझ्यावर अन्याय केला.  परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनी विश्वास दाखवत मला संधी दिली. खडसे राजकारणातून इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना उत्तरे मिळाली, असे सांगतानाच या निवडणुकीत आपला विजय होईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला. 

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाविकास आघाडी सरकारने पाठविलेल्या यादीत खडसे यांचेही नाव होते. राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांचे नाव पाठविण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, राजभवनाने या यादीवर अद्याप मान्यतेची मोहोर उठविली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी प्रवेशानंतरही खडसे यांचे पुनर्वसन रखडले होते. अखेर आता विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

विधानभवनात खडसे-महाजन भेटभाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर अलीकडच्या काळात वारंवार दिसून आले. दोन नेत्यांनी एकमेकांवर जाहीर टीकाही केली. मात्र, गुरुवारी विधान मंडळात योगायोगाने हे दोन्ही नेते एकमेकांसमोर आले. तेव्हा हसऱ्या चेहऱ्याने सामोरे जात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अभिवादन केले. यावेळी खडसे  यांचा हात महाजन यांच्या खांद्यावर विसावला होता. तर, महाजन यांनी नमस्कार करत खडसेंना शुभेच्छा दिल्या. अवघ्या अर्धा मिनिटांच्या या भेटीची विधानभवनात चांगलीच चर्चा रंगली होती. खडसे आपला अर्ज भरण्यासाठी तर महाजन हे भाजपच्या उमा खापरे यांचा अर्ज भरण्यासाठी विधान मंडळात होते.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजनVidhan Parishadविधान परिषद