शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Khadse: 'गिरीश महाजनांची गेस्टहाऊसवरील भानगड मी पाहिलीय'; एकनाथ खडसे मुलाच्या विषयावर भावूक झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 23:57 IST

Eknath Khadse on Girish Mahajan: एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत अनेक वर्षानंतर गिरीश महाजन यांनी या प्रकरणी आरोप केला आहे.

जळगाव : एकनाथ खडसेगिरीश महाजन यांच्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला याची चौकशी व्हायला पाहिजे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे एकनाथ खडसे व त्यांचे कुटुंबीय भावनिक झाले असून या आरोपामुळे माझ्या परिवाराला अत्यंत वेदना झाल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. 

अत्यंत नीच व हलकट प्रवृत्तीने गिरीश महाजनांनी अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केले असून माझ्या मुलाने आत्महत्या केली त्यावेळी मी इथे नव्हतो. मग गिरीश महाजन यांना रक्षावर संशय आहे का? असा सवाल उपस्थित केला. आमच्या परिवारावर संशय घेण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांनी केला असल्याचे खडसे यांनी म्हटले. गिरीश महाजन यांना सत्तेचा माज व सत्तेची मस्ती असून जनता मात्र ही मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही एकनाथ खडसेंनी केली आहे.

एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत अनेक वर्षानंतर गिरीश महाजन यांनी या प्रकरणी आरोप केला आहे. मात्र या मागचे कारण गिरीश महाजन यांनाच माहिती असून त्यांनी फर्दापूरच्या गेस्टहाऊसवर काय भानगड झाली होती, त्यावेळी मी देखील त्या गेस्टहाऊसवर होतो. मी अनेक कृत्ये उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. तेव्हा पेपरमध्ये चवीने छापून येत होते. मी त्यावर काही बोललो नाही. गिरीश महाजन यांचे अनेक महिलांशी प्रेम संबंध आहेत. मात्र याचा कधी उल्लेख मी केला नाही. एखाद्याचे प्रेमसंबंध असू शकतात, असा टोला खडसे यांनी लगावला.

नाहीतरी तुम्ही नाथाभाऊची चौकशी करून थकलात, त्यामुळे कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून माझ्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करा, असा थेट इशारा एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांना दिला आहे. मी त्यांना अडचणीचा ठरतो म्हणून अशा प्रकारे गिरीश महाजन उपद्व्याप करत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजन