ऐंशी लाखांची रोकड अमळनेरमध्ये जप्त
By Admin | Updated: October 12, 2014 01:48 IST2014-10-12T01:48:24+5:302014-10-12T01:48:24+5:30
मतदारांना आमिष दाखविण्याच्या हेतूने 8क् लाखांची रक्कम बाळगल्याप्रकरणी मधुकर चौधरी व योगेश भिका चौधरी या दोघांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ऐंशी लाखांची रोकड अमळनेरमध्ये जप्त
>अमळनेर (जि. जळगाव) : मतदारांना आमिष दाखविण्याच्या हेतूने 8क् लाखांची रक्कम बाळगल्याप्रकरणी मधुकर चौधरी व योगेश भिका चौधरी या दोघांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 1 ते तीन वाजेदरम्यान शहरातील एका हॉटेलवर छापा टाकून जगदीश चौधरी व योगेश चौधरी यांच्याकडून 8क् लाखांची रोकड जप्त केली होती. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिका:यांकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान, ही रक्कम जगदीश चौधरी यांची असल्याचे सांगण्यात येते.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवशी योगेश चौधरी हा उमेदवारासोबत होता. त्यामुळे ही रक्कम मतदारांना प्रलोभन दाखविण्यसाठीच असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. भरारी पथकातील योगेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)