आठवलेंचा महायुतीला ‘दे धक्का’

By Admin | Updated: June 3, 2015 05:07 IST2015-06-03T03:23:35+5:302015-06-03T05:07:49+5:30

महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी आणि रिपाइंमध्ये युती झाल्याने राज्यस्तरावर

Eight-year-old Mahayuti 'Dh Dhakka' | आठवलेंचा महायुतीला ‘दे धक्का’

आठवलेंचा महायुतीला ‘दे धक्का’

वसई : महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी आणि रिपाइंमध्ये युती झाल्याने राज्यस्तरावर असलेल्या भाजप-सेना-रिपाइं महायुतीला येथे छेद गेला आहे.
सोमवारी राजकीय क्षितिजावर अचानक घडलेल्या घडामोडीमुळे राज्यस्तरावर असलेल्या भाजपा-सेना व रिपाइं अशा महायुतीला वसई विरारमध्ये झटका बसला. रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतर बहुजन विकास आघाडी व रिपाइं आठवले गट यामध्ये समझोता झाला.
बहुजन विकास आघाडीने
काही जागा रिपाइंसाठी सोडल्या. यामुळे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.
रिपाइंने पाठिंबा देऊ केल्यामुळे बहुजन विकास आघाडीला दलित मतांचा जोगवा मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Eight-year-old Mahayuti 'Dh Dhakka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.