शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

विदर्भातील आठ वाघोबा चढणार सह्याद्री डोंगररांगा; वनविभागाचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 12:30 IST

चंद्रपूर, ताडोबामध्ये वाढलेली वाघांची संख्या कमी करण्याचा निर्णय वन मंत्रालयाने घेतला आहे. 

सांगली : विदर्भातील ताडोबा, चंद्रपुरातील आठ वाघ सह्याद्री डोंगररांगांत सोडण्यात येणार आहेत. त्याचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे चांदोली, कोयनेच्या जंगल प्रक्षेत्रात व कडेकपाऱ्यांत आता बिबट्यांच्या जोडीने वाघोबांचाही संचार होईल. वाघ स्थलांतरासाठी वनविभागाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे परवानगी मागितली. चंद्रपूर, ताडोबामध्ये वाढलेली वाघांची संख्या कमी करण्याचा निर्णय वन मंत्रालयाने घेतला आहे. 

सह्याद्रीच्या खोऱ्यात वाघ सोडण्याच्या प्रस्तावानंतर वनविभागाने काही वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. चांदोलीमध्ये झोळंबी पठारावर सुमारे १० हेक्टर क्षेत्रात गवताळ कुरण विकसित केले. येथे तृणभक्षी प्राण्यांची पैदास सुरू आहे. त्यांची वाढ झाल्यानंतर जंगलात सोडून दिले जाते. या माध्यमातून वाघांसाठी अन्न उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. 

चांदोली, काेयनेत सध्या सात वाघ- यावर्षी झालेल्या प्राणीगणनेत कोयना व चांदोलीच्या जंगल परिसरात सात वाघ आढळले आहेत.- वनविभागाच्या कॅमेऱ्यात त्यांची छबी टिपली गेली असून, वाघांची अधिकृत संख्या जाहीर करण्यात आली आहे. हे वाघ स्थायी स्वरूपाचे नाहीत. - सह्याद्रीच्या कॅरिडॉरमध्ये फिरत राहणारे आहेत. दांडेली-म्हादई-गोवा-दोडामार्ग-चंदगड-राधानगरी-चांदोली-कोयना हे त्यांचे भ्रमण क्षेत्र आहे. 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभागforestजंगल