आठ हजार विद्याथ्र्याच्या गुणपत्रिका रखडल्या
By Admin | Updated: July 26, 2014 00:56 IST2014-07-26T00:56:29+5:302014-07-26T00:56:29+5:30
मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय.बी.कॉम आणि टी.वाय.बी.ए. या परीक्षांचे निकाल जाहीर होऊन बराच कालावधी लोटला तरी अद्याप विद्याथ्र्याना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत.

आठ हजार विद्याथ्र्याच्या गुणपत्रिका रखडल्या
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय.बी.कॉम आणि टी.वाय.बी.ए. या परीक्षांचे निकाल जाहीर होऊन बराच कालावधी लोटला तरी अद्याप विद्याथ्र्याना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. महाविद्यालये, एमकेसीएल आणि विद्यापीठामध्ये समन्वय नसल्याने गुणपत्रिका रखडल्या आहेत. या प्रकाराने विद्यापीठाने गोंधळाची परंपरा कायम ठेवली आहे.
टी.वाय.बी.कॉम परीक्षेला विद्यापीठातून सुमारे 65 हजार विद्यार्थी बसले होते. परीक्षेचा निकाल जाहीर झाला तरी अद्याप हजारो विद्याथ्र्याना मूळ गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. श्रेयांक श्रेणी पद्धतीनुसार प्रथम, द्वितीय परीक्षांचे गुण महाविद्यालये एमकेसीएलमार्फत विद्यापीठाकडे पाठवितात. सर्व सेमिस्टरच्या गुणांच्या आधारानुसार विद्याथ्र्याना श्रेणी दिली जाते. मात्र, एमकेसीएलकडून सुमारे आठ हजार विद्याथ्र्याचे गुण विद्यापीठाकडे अद्याप आले नसल्याने या विद्याथ्र्याच्या गुणपत्रिकाच तयार झालेल्या नाहीत. एमकेसीएलकडून प्रथम आणि द्वितीय वर्षाचे गुणच आले नसल्याने विद्याथ्र्याच्या गुणपत्रिका तयार झाल्या नसल्याचे विद्यापीठातील सूत्रंनी सांगितले.
राज्यातील इतर विद्यापीठांतील अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आली तरी विद्यापीठातील विद्याथ्र्याच्या गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. यामुळे विद्याथ्र्याना मुंबईबाहेर शिक्षणासाठी जायचे असल्यास त्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. तसेच नोकरीसाठी गुणपत्रिकेची मागणी झाल्यास विद्याथ्र्याला नोकरी गमवावी लागणार आहे. गुणपत्रिकेच्या मागणीसाठी विद्यापीठात दररोज हजारो विद्यार्थी चकरा मारत असून त्यांना केवळ निकाल लवकरच देण्यात येतील, अशी फुटकळ आश्वासने देण्यात येत आहेत. यामुळे विद्यापीठाच्या या कारभाराला विद्यार्थीही कंटाळले आहेत. याबाबत परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका विद्याथ्र्याना बसत आहे. यामुळे एमकेसीएलला दिलेले कंत्रट रद्द करण्यात यावे. तसेच विद्याथ्र्याच्या गुणपत्रिका तातडीने देण्यात याव्यात, असे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी सांगितले.