शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुलींना एक रुपयात आठ सॅनिटरी नॅपकिन, १०० कोटी रुपयांची तरतूद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 06:58 IST

मंत्री गिरीश महाजन यांची सभागृहात घोषणा.

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागातील ११ ते १९ वयोगटातील मुलींना एक रुपयात आठ सॅनिटरी नॅपकिन देण्यात येतील, तसेच महिला बचत गटातील लाखो महिलांना पूर्वीपेक्षा कमी दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जातील, अशी घोषणा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. 

भाजपच्या नमिता मुंदडा यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. त्यावर वर्षा गायकवाड, भारती लव्हेकर, हसन मुश्रीफ, सुलभा खोडके, राजेश टोपे यांनी उपप्रश्न उपस्थित केले. पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असताना ११  ते १९ वयोगटातील मुली तसेच बचत गटात कार्यरत असलेल्या २९ लाख महिलांसाठी स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन देणारी ‘अस्मिता’ योजना आणली होती. डिसेंबर २०२२ पासून ती का बंद करण्यात आली आणि आता योजना कधी सुरू करणार, असा प्रश्न मुंदडा यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकार असताना स्वस्त धान्य दुकानातून सॅनिटरी नॅपकिन वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यासाठी ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते, याकडे मुश्रीफ यांनी लक्ष वेधले.  

१०० कोटी रुपयांची तरतूद  

  • महाजन यांनी सांगितले की, बचत गटांमधील महिलांना पूर्वी आठ सॅनिटरी नॅपकिन २४ रुपयांना दिले जात होते. हा दर कमी केला जाईल. बाजारामध्ये त्याची किमान किंमत ३८ रुपये आहे. येत्या दीड महिन्यात ही योजना पुन्हा सुरू केली जाईल. या योजनेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
  • रेशन दुकानांमधून त्यांचे वितरण करायचे काय याबाबतही विचार केला जाईल. महिला आमदारांच्या काही सूचना असतील तर त्यांचा अंतर्भाव केला जाईल व त्यासाठी त्यांची बैठक लवकरच घेतली जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले.
टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनMaharashtraमहाराष्ट्र