वसईमधून चार दिवसांत आठ जण बेपत्ता
By Admin | Updated: October 20, 2016 05:30 IST2016-10-20T05:30:20+5:302016-10-20T05:30:20+5:30
वसई तालुक्यात गेल्या चार दिवसात तब्बल आठ जण बेपत्ता झालच तक्रारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या

वसईमधून चार दिवसांत आठ जण बेपत्ता
विरार : वसई तालुक्यात गेल्या चार दिवसात तब्बल आठ जण बेपत्ता झालच तक्रारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या आहेत. अवघ्या आठ महिन्यात सातशेच्या आसपास बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता होणाऱ्यांमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलांचें प्रमाणं जास्त असल्याचे समोर आले आहे.
नालासोपारा पूर्वेकडील गणेशनगर मधील आरती मकवाना (१५) ही मुलगी शनिवारी सकाळी कॉलेजला गेली होती. ती गेल्या दोन दिवसापासून घर परतली नसल्याने तिचे वडिल महेश मकवाना यांनी तुळींज पोलीस ठाण्यात पळवून नेल्याची तक्रार केली आहे.
विरार पूर्वेकडील जीवदानीपाडा येथे राहणारा महेंद्र जाधव (१५) रविवारी बेपत्ता झालची तक्रार त्याच्या आईने दिली. विरार पूर्वेला असलेल्या गुरुनाथ नगरमध्ये राहणाऱ्या सुशील सुखलाल राठोड यांची मेहुणी नीलम शर्मा (१७) ही सोमवारी दुपारी बेपत्ता झाल्याची तक्रार विरार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तसेच नारायणनगरमधील सविता गौतम (१५) ही मुलगी सोमवारी शाळेत गेलेली मुलगी घरी परत न आल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेली आहे. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे परिसरात राहणाऱ्या राजशेखर पाल यांचा सतीश पाल (१४) हा मुलगा शेजारीच असलेल्या सौरभ राजबली गौड (१३) आणि सत्यम कलबहादूर सिंग (१२) या दोन मुलांबरोबर
खेळत होता. रविवारी अचानक तिघेही बेपत्ता झाले आहेत. तर
विरार पूर्वेला असलेल्या गुरुकृपा
नगर मधील जिपीका पांचाळ (१५)
ही शाळकरी मुलगी सोमवारी
शाळेत जाण्यासाठी गेली ती परत न आलची तक्रार तिची आई लीना पांचाळ यांनी विरार पोलीस ठाण्यात केली आहे. (वार्ताहर)