यवतमाळ/गोंदिया : यवतमाळ आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांत गुरुवारी विविध ठिकाणी वीज कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला. तर अन्य १४ जण जखमी झाले. जखमींत १० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून चंदा रामगडे (६०), तेजस्विनी रामगडे (२५), मधुकर ठोंबरे (३०), हेमंत थरकडे (२५), मंजुळा राऊत (६५), सखुबाई आसोले (६०) यांचा मृत्यू, तर सुमित्रा अंबाडारे (४२), विजय अंबाडारे, दिनू राऊत हे जखमी झाले.तर गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील बोरा येथे शेतकरी तेजलाल नागपुरे (५२) हे शेतात असताना वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच खोडगावातील शेतकरी जगदीश नागपुरे (३८) यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर एकोडी जि.प. शाळेच्या इमारतीवर वीज कोसळून दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत.
विदर्भात वीज कोसळून आठ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 05:11 IST