नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा मिळाले आठ मोबाईल
By Admin | Updated: December 22, 2016 17:06 IST2016-12-22T17:06:16+5:302016-12-22T17:06:16+5:30
मध्यवर्ती कारागृहात (सेंट्रल जेल)मध्ये पुन्हा एकदा आठ मोबाईल झाडाझडतीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा मिळाले आठ मोबाईल
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 22 - नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात (सेंट्रल जेल)मध्ये पुन्हा एकदा आठ मोबाईल झाडाझडतीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आढळलेल्या मोबाईलपैकी एकाही मोबाईलमध्ये सिमकार्ड नव्हते. चार ते पाच दिवसांमध्ये पंधरा ते वीस मोबाईल अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी अज्ञात बंदींविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकारोड मध्यवर्ती कारागृहात प्रशासनाने रात्रीच्या सुमारास राबविलेल्या झडतीसत्रात मंडल क्रमांक सात व सर्कल सहा आणि बॅरेक क्रमांक चारच्या स्वच्छतागृहांजवळ हे मोबाईल आढळून आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
एकूण चार हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही कैद्यांना येरवडा व मुंबईतील तळोजा कारागृहात हलविण्यात आल्याचे समजते. तरुंगाधिकारी वामन निमजे यांच्या फिर्यादिवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.