नऊ तासांत आठ सोनसाखळी चो-या
By Admin | Updated: January 30, 2015 04:02 IST2015-01-30T04:02:20+5:302015-01-30T04:02:20+5:30
शहरात बुधवारी दुपारी २ ते रात्री १० या नऊ तासांत धूम स्टाइलने चोरट्यांनी ८ घटनांत १७ तोळे दागिने हिसकावले. ३ लाख १७ हजारांचा ऐवज चोरीला गेला
नऊ तासांत आठ सोनसाखळी चो-या
ठाणे : शहरात बुधवारी दुपारी २ ते रात्री १० या नऊ तासांत धूम स्टाइलने चोरट्यांनी ८ घटनांत १७ तोळे दागिने हिसकावले. ३ लाख १७ हजारांचा ऐवज चोरीला गेला.
चंदनवाडीतील शोभा शिलकर या दुपारी पावणेदोन वाजता अल्मेडा रोडने जाताना त्यांच्या गळ्यातील १३ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावले. तर दुसऱ्या घटनेत, कळव्यामधील रिता ढाके या खारेगाव येथून जाताना त्यांची १८ ग्रॅमची सोन्याची चेन चोरीला गेली. तिसऱ्या घटनेत, डोंबिवलीतील शिक्षिका शोभा पुराणिक यांच्या गळ्यातील ३० ग्रॅमचे मंगळसूत्र, चौथ्या घटनेत दर्शना शिंदे यांचे २४ ग्रॅमचे, पाचव्या घटनेत पुण्यातील जयश्री शिंदे यांचे अडीच तोळ्यांचे दागिने, सहाव्या घटनेत पाचपाखाडीतील सुलोचना कडू यांचे तीन तोळ्यांचे, सातव्या घटनेत टेंभीनाका येथील मीनल देसाई यांचे २ तोळ्यांचे आणि वागळे इस्टेटमधील प्रियंका सावंत यांचे ८ ग्रॅमचे सोन्याचे दागिने असे चोरीला गेले. (प्रतिनिधी)