तब्बल आठ तासांनी महापुरात अडकलेल्याला काढले बाहेर
By Admin | Updated: July 13, 2016 20:19 IST2016-07-13T20:19:11+5:302016-07-13T20:19:11+5:30
शिरोली (ता.हातकणंगले,जिल्हा कोल्हापूर)येथील शेतकरी मारूती मोंगले, भाऊसाहेब मोंगले यांना तब्बल आठ तासांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने सुरक्षित बाहेर काढले.

तब्बल आठ तासांनी महापुरात अडकलेल्याला काढले बाहेर
सतीश पाटील/ऑनलाइन लोकमत
शिरोळी, दि.13 - महापुराच्या पाण्यात तीन किलोमिटर आत अडकलेल्या शिरोली (ता.हातकणंगले,जिल्हा कोल्हापूर)येथील शेतकरी मारूती मोंगले, भाऊसाहेब मोंगले यांना तब्बल आठ तासांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने सुरक्षित बाहेर काढले. शिरोली माळवाडी भागातील शेतकरी नवनाथ संकपाळ ,मारूती मोंगले ,भाऊसाहेब मोंगले हे तिघेजण सकाळी आठ वाजता जणावरांना चारा आणण्यासाठी पंचगंगा नदी किनारी डांगे मळ्यात गेले होते ,सकाळी आत जाताना एक दीड फूटच पाणी होते, पण हळूहळू पाणी वाढत वाढत सहा सात फूटावर गेले पाणी वाढत असल्याचे लक्ष्यात आल्यावर तिघांनी शेजारच्या आंब्याच्या झाडाचा आधार घेतला, आणि झाडावर जाऊन बसले ,पण यातील मारूती मोंगले ,भाऊसाहेब मोंगले यांना पोहता येत नव्हते आणि पाणी ही कमी होईना ,नवनाथ संकपाळ याला पोहता येत होते, दुपारी एकच्या सुमारास नवनाथने धाडस करून पोहत काटावर आला ,आणि घरी जाऊन तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील यांना ही घटना सांगीतली ,सतीश पाटील आणि शिवसेना जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष दीपक यादव यांनी तहसीलदार दीपक शिंदे यांना फोन करून महापूरात दोन शेतकरी अडकले आहेत ,असे सांगीतले,आणि दुपारी दोन नंतर या शेतकर्याना वाचवण्यासाठी गतीने चक्रे फिरली ,स्थानिक पट्टीचे पोहणारे ज्योतीराम पोर्लेकर , अतुल सोडगे , अवदुत पवार ,रणजीत मोंगले, नागनाथ संकपाळ, अनिल मोरे ,तानाजी गायकवाड ,गुंडा सोडगे यांनी निकम पाणंदीने आत जाण्यासाठी दोनदा प्रयत्न केला पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने आत जाताच येईना अखेर साडेतीन वाजता स्थानीक पोहणारे वरील तेरा जण पंचगंगा नदी शेजारच्या दर्गा समोरून पाण्यात उतरले ,ते आत पाण्यात गेले तोच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आले हे पथ चार वाजता आडकलेल्या लोकांना आणण्यासाठी गेले घटनास्थळी चार वाजून विस मिनीटानी पोहचले चार चाळीसला त्यांना सुखरूप बाहेर काढले यावेळी आमदार अमल महाडीक,प्रांताधिकारी अश्विनी जिरगे,सलिम महात ,महेश चव्हाण,सुरेश यादव ,सतीश पाटील ,दीपक यादव यांच्यासह नागरीक मोठ्या संखेने घटनास्थळी होते.
सुखरूप पोहचलो-
महापुरात आडकलेल्या शेतकर्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने सुखरूप बाहेर आणले त्यांना पहाण्यासाठी गावकरी आणि महामार्गावरील लोकांनी मोठी गर्दी केली होती ,यावेळी पाण्यातून बाहेर आल्यावर भाऊसाहेब मोंगले ,मारूती मोंगले यांना घेरा घातला ,घरच्या मुलांनी अंगातील भिजलेले कपडे काढून नविन कपडे घालण्यासाठी दिले हे दोघे ही भांबावलेले होते ,पाण्यातून बाहेर आल्यावर जिवातजीव आला बाहेर आल्यावर सुखरूप पोहचलो एकदाचे असे दोघे म्हणत त्यांच्या चेहर्यावर आंनंद दिसत होता.
भूक लागली आहे :-
सकाळी घरातून सात वाजता जनावरांना चारा आणण्यासाठी नवनाथ संकपाळ, भाऊसाहेब मोंगले ,मारूती मोंगले हे तिघेजण गेले होते, पुराचे पाणी वाढल्याने तिघेही पाण्यात आडकून बसले होते ,त्यातील नवनाथ दोन वाजता बाहेर आला,आणि दुपारी चार वाजता राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने उर्वरीत दोघांना आठ तासानी बाहेर काढले, पुरात आडकलेले दोघेजण साठ वर्षा पेक्षा जास्त असल्याने दोघांनाही भूक लागून पोटात कावळे ओरडत होते,त्यांना पहाण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती,यावेळी मारूती मोंगले भूका लागल्यात घराकडे जातो असे म्हणून तेथून बाहेर पडले.
राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे अभिनंदन:-
राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने गेल्या तिन दिवसांत अतिशय चांगले काम केले आहे,वाहुन गेलेल्या मुलग्याला शोधन्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न केला, शिरोली येथील या दोन शेतकर्याचे जिव वाचवले त्याबद्दल शिरोलीत पंचगंगा नदी पुलावर घटनास्थळी येऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे खास अभिनंदन केले.
नवनाथचे धाडस :-
गेल्या तीन दिवसापासून धुंवाधार पाऊस पडत आहे ,नवनाथ आणि मोंगले बंधू जनावरांना चारा आणण्यासाठी गेले आणि पुराच्या पाण्यात आडकले ,पाणी वाढत असलेले नवनाथच्या लक्षात आले आणि तिघांनी शेजारच्या आंब्याच्या झाडाचा आधार घेतला, पण मारूती मोंगले,भाऊसाहेब मोंगले यांना पोहता येत नव्हते, दुपारी एक वाजता नवनाथने धाडस करून पुराच्या पाण्यातून तिन किलोमिटर पोहत येऊन घरी व इतर लोकांना ही घटना सांगीतली त्यामुळे नवनाथच्या धाडसामुळे दोघांचे प्राण वाचले आहेत.