‘आठ तासांची ड्यूटी अशक्य’
By Admin | Updated: January 12, 2017 03:53 IST2017-01-12T03:53:09+5:302017-01-12T03:53:09+5:30
मुंबईतील पोलिसांना ८ तास ड्यूटी देण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर

‘आठ तासांची ड्यूटी अशक्य’
औरंगाबाद : मुंबईतील पोलिसांना ८ तास ड्यूटी देण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांच्याही आशा पल्लवीत झाल्या. तथापि, पुरेशा मनुष्यबळाअभावी अशी ड्यूटी देणे शक्य नसल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, राज्यातील पोलिसांनाही ८ तासांची ड्यूटी देण्यासाठी मनुष्यबळ अपुरे आहे. विद्यमान पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येपेक्षा ३५ टक्के अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी आणखी पदनिर्मिती करावी लागेल. (प्रतिनिधी)