सोलापूरमध्ये बस अपघातात आठ ठार
By Admin | Updated: October 7, 2014 10:30 IST2014-10-07T10:30:49+5:302014-10-07T10:30:49+5:30
शिर्डीहून पंढरपूरला जाणारी खासगी बस मंगळवारी पहाटे सोलापूरमध्ये नदी पात्रात कोसळल्याने बसमधील ८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सोलापूरमध्ये बस अपघातात आठ ठार
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ७ - शिर्डीहून पंढरपूरला जाणारी खासगी बस मंगळवारी पहाटे सोलापूरमध्ये नदी पात्रात कोसळल्याने बसमधील ८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा महिला व दोन पुरुषांचा समावेश असून यातील बहुसंख्य प्रवासी हे आंध्रप्रदेशमधील रहिवासी असल्याचे समजते.
सोलापूर येथील करमाळा - टेंभुर्णी रोडवर एक खासगी बस मंगळवारी पहाटे नदीपात्रात कोसळली. या अपघातात आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.