शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

संसदेचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न, संजय राऊत यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 00:53 IST

लोकशाहीत संसदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र सध्या संसदेचे महत्त्व कमी करण्याचे, संसद चालूच नये असे प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई : लोकशाहीत संसदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र सध्या संसदेचे महत्त्व कमी करण्याचे, संसद चालूच नये असे प्रयत्न केले जात आहेत. सीएएवर संसदेत नऊ तास चर्चा सुरू असताना पंतप्रधान मात्र नऊ मिनिटेही उपस्थित राहत नाहीत. काँग्रेसने नेहमी संसदेला महत्त्व दिले. सध्या केवळ विधेयके मंजूर करण्यासाठी संसदेचा वापर केला जात आहे, अशी खंत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या वेळी राऊत यांच्या हस्ते मनश्री पाठक, सदानंद खोपकर, गुणाजी काजिर्डेकर, जयू भाटकर, संजीवनी खेर, वैभव परब व तेजस वाघमारे यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, आमदार सुनील प्रभू, प्रकाश सुर्वे, माजी आमदार सुनील शिंदे, पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.राऊत म्हणाले, राज्यात परिवर्तन करण्याची क्षमता बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती व शरद पवार यांच्यामध्ये आहे. राज्यात परिवर्तन व्हावे असा ठाम निर्णय पवारांनी घेतला होता. पवार राष्ट्रपती, पंतप्रधान व्हावेत अशी आमची सदिच्छा आहे. ते पंतप्रधान, राष्ट्रपती होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पवार राष्ट्रपती झाल्यास मराठी माणसाला आनंद वाटेल. पवारांचे राजकीय व सामाजिक कार्य फार मोठे आहे. नरेंद्र वाबळे व संजय परब यांनी राऊत यांची प्रकट मुलाखत घेतली. धनश्री प्रधान दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.बाळासाहेब टीका करणाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधायचे. बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी पुढे नेली. त्यांच्यामध्ये चांगले प्रशासकीय गुण आहेत. त्यांच्यात व माझ्यात वाद करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र आमची दोघांची चांगली मैत्री आहे, असे राऊत म्हणाले. सरकारविरोधात उभे राहणे हा देशद्र्रोह नाही. मात्र सध्या तसे चित्र निर्माण केले जात आहे. सध्या अप्रत्यक्ष आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. त्याविरोधात आवाज उठवण्याचे काम केले. दिल्लीची दहशत झुगारून लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्राने केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.राजकारणात काम करताना केंद्रात मंत्री होणे सहज शक्य होते. मात्र सामनाचा राजीनामा द्यावा लागला असता त्यामुळे मंत्रिपद स्वीकारले नाही, मंत्री झाल्यास सामनाशी, पत्रकारितेशी संपर्क सुटेल अशी भीती होती, असे राऊत म्हणाले.>हिंदुत्वावर कायमशिवसेनेने हिंदुत्व सोडले हा अपप्रचार केला जात आहे. सावरकर हे महान आहेत. त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. सावरकरांना भाजपने सत्तेवर आल्यावर पहिला भारतरत्न पुरस्कार देण्याची गरज होती. मात्र त्यांनी साडेपाच वर्षांत पुरस्कार दिला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच अयोद्धेला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सरकार धर्माच्या आधारावर नव्हेतर, किमान समान कार्यक्रमावर चालते. हे सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धर्मावर पोट भरत नाही. सरकार संविधानानुसार चालेल, असेही राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत