६ लाख उत्पन्न मर्यादा असणा-या सर्वांना मिळणार शैक्षणिक सवलत

By Admin | Updated: October 13, 2016 14:16 IST2016-10-13T13:46:58+5:302016-10-13T14:16:04+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती संदर्भात महत्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.

Educational Resolve to all those who have a limit of six lakh income | ६ लाख उत्पन्न मर्यादा असणा-या सर्वांना मिळणार शैक्षणिक सवलत

६ लाख उत्पन्न मर्यादा असणा-या सर्वांना मिळणार शैक्षणिक सवलत

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १३ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती संदर्भात महत्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. सरकारने ईबीसी सवलतीची मर्यादा आता एक लाखावरुन सहा लाखापर्यंत वाढवली आहे. व्यावसायिक शिक्षणात  सहा लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या सर्वांना या योजनेतर्गंत लाभ मिळणार आहे. 
 
२.५ लाख ते ६ लाखपर्यंत उत्पन्न फक्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी ६० टक्के गुण अनिवार्य असतील. 'राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख योजना, पंडीत दिनदयाळ उपाध्याय योजना अशा शैक्षणिक योजना मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल्या. शिक्षणासंदर्भातील मराठी क्रांती मोर्चाची महत्वाची मागणी मान्य झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: Educational Resolve to all those who have a limit of six lakh income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.