शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात शैक्षणिक आराखडा; शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे संस्थाचालकांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 07:23 IST

पायाभूत सुविधांचा विकास करणार असल्याचीही दिली ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देण्यात संस्थाचालकांची मोलाची भूमिका असून शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. शिक्षण क्षेत्रात राज्याचा लौकिक निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढे यावे. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय बदलावे लागतील. येत्या आठवडाभरात शैक्षणिक आराखडा तयार केला जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी शैक्षणिक संस्थाचालकांना दिले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती’ विषयावर राज्यातील शिक्षण आणि शैक्षणिक संस्थांच्या संघटनांच्या प्रतिनिधींचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्यासह सुमारे १२५ संस्थाचालक आणि मुख्याध्यापक या चर्चासत्राला उपस्थित होते. 

मंत्री भुसे म्हणाले की, यापुढे कौशल्य व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यावर भर द्यावा. शालेय शिक्षण विभागाचा कृतीवर अधिक भर असून चांगल्या कामास, उपक्रमास सरकार सहकार्य करेल. 

अडचणी सोडवू

संस्थाचालक आणि संघटनेच्या प्रतिनिधींनी शिक्षक भरती, संच मान्यता, पवित्र पोर्टल, ११ वी प्रवेश प्रक्रिया, रोस्टर तपासणी, जुनी पेन्शन, सेवा ज्येष्ठता, अशैक्षणिक कामे आदी मांडलेल्या मुद्यांचा विचार केला जाईल. शाळा पातळीवरील अडचणी तीन महिन्यांत सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.

पायाभूत सुविधांचा विकास करणार

शिक्षण क्षेत्रातील घटकांसोबत शिक्षणमंत्र्यांनी दोन महिन्यांतून एकदा अशी चर्चासत्रे घ्यावीत अशा सूचना संस्थाचालक, मुख्याध्यापकांनी केल्या. येत्या काळात शाळांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्याकडे लक्ष पुरवू असे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Educationशिक्षण