शिक्षणतज्ज्ञ मालवीय
By Admin | Updated: December 25, 2014 02:12 IST2014-12-25T02:12:02+5:302014-12-25T02:12:02+5:30
एक राजकीय मदनमोहन मालवीय एक शिक्षणतज्ज्ञ होते़ बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक म्हणून ते सर्वपरिचित आहेत़

शिक्षणतज्ज्ञ मालवीय
एक राजकीय मदनमोहन मालवीय एक शिक्षणतज्ज्ञ होते़ बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक म्हणून ते सर्वपरिचित आहेत़ २५ डिसेंबर १८६१ रोजी अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला़ त्यांचे वडील पंडित ब्रजनाथ संस्कृतचे विद्वान होते़ मालवीय यांनी कोलकाता विद्यापीठातून बीए पदवी घेतली़ १८८४ मध्ये अलाहाबाद जिल्हा शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी पत्करली़ तत्कालीन परंपरेनुसार, वयाच्या १६व्या वर्षी कुंदन देवी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला़ त्यांना १० अपत्ये झालीत़़ १८९१ मध्ये त्यांनी अलाहाबाद जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली़ १८९३ साली अलाहाबाद उच्च न्यायालयात त्यांनी वकिली पत्करली़ त्यानंतर निवृत्ती पत्करत त्यांनी स्वत:ला समाजाला वाहून घेतले़ मात्र याचदरम्यान १७७ स्वातंत्र्यसैनिकांना एका प्रकरणात फाशी ठोठावण्यात आली़ मालवीय यांनी त्यांची वकिली पत्करली आणि आपली योग्यता आणि तर्कांच्या जोरावर १५१ स्वातंत्र्यसैनिकांची निर्दोष सुटका केली़
१९१२ साली ते ब्रिटिश कौन्सिलचे सदस्य बनले़ १९२८ साली सायमन चले जावो, आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला होता़
बनारस हिंदू विद्यापीठाच्या रूपाने शिक्षण क्षेत्रात त्यांनी अपूर्व योगदान दिले़ प्राचीन भारतीय परंपरा कायम ठेवत जगभरातील तांत्रिक प्रगतीचेही शिक्षण दिले जाईल, असे विद्यापीठ साकारायचा पण त्यांनी केला आणि तो पूर्णही केला़ १९१६ मध्ये भारतात बनारस हिंदू विद्यापीठ साकारले़ मदनमोहन मालवीय हिंदू महासभेच्या एका प्रभावी नेत्यांपैकी एक होते़ शांतताप्रिय, सरळसाधे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते़ १२ नोव्हेंबर १९४६ रोजी वयाच्या ८५ वर्षी त्यांचे निधन झाले़