शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

शिक्षण, नोकरीत अनाथांना आरक्षण, राज्य शासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 04:53 IST

राज्यातील अनाथांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. गट अ ते ड पर्यंतच्या सर्व नोक-यांसाठी हे आरक्षण लागू असेल.

- यदु जोशीमुंबई  - राज्यातील अनाथांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. गट अ ते ड पर्यंतच्या सर्व नोक-यांसाठी हे आरक्षण लागू असेल. अनाथकन्या अमृता करवंदेच्या निमित्ताने ‘लोकमत’ने सर्वप्रथम हा विषय समोर आणला होता.महिला व बाल कल्याण विभागाने आज जीआर काढून अनाथांना शिक्षण व नोकºयांमध्ये एक टक्का आरक्षणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. बालगृहातील व इतर अनाथ मुलांपैकी महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात येणारे अनाथ प्रमाणपत्र असणाºया मुलांसाठीच हे आरक्षण लागू राहील. ज्या मुलांच्या कागदपत्रावर कोणत्याही जातीचा उल्लेख नाही व ज्यांचे आईवडील, काका-काकू, आजी-आजोबा व चुलत भावंडे व इतर नातेवाईक यापैकी कोणाही बाबतीत माहिती उपलब्ध नाही अशा मुलांनाच अनाथ आरक्षण लागू राहील.शिक्षणांतर्गत शिष्यवृत्ती, वसतिगृह व व्यावसायिक शिक्षणांतर्गतच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेमध्येही हे आरक्षण लागू राहील. अनाथांसाठीच्या आरक्षित जागेसाठी अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्यास आरक्षणाचा अनुशेष पुढे न ओढता खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार इतर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.जातीची दुरुस्ती आवश्यकअनेक अनाथ मुलांच्या कागदपत्रांवर जातीचा उल्लेख असतो. कारण, अनाथालयांचे संचालक त्यांचे पालकत्व घेतात आणि दाखल्यांमध्ये त्यांची जात अनाथ मुलामुलींना लावली जाते.मात्र, शासनाच्या आजच्या निर्णयात मुलामुलींच्या कागदपत्रांवर कोणत्याहीजातीचा उल्लेख नसावा, तरच आरक्षण मिळेल, अशी अट टाकण्यात आली आहे. त्याऐवजी अनाथालयात जात मिळालेल्यांनाही हे आरक्षण लागू राहील, अशी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे.लोकमतचा पुढाकारअमृता एमपीएससीच्या परीक्षेत पास झाली, पण क्रिमिलेअरमध्ये तिने ‘नो’ असे लिहिले आणि तिचा समावेश खुल्या प्रवर्गात होऊन ती अनुत्तीर्ण झाली. यावर ‘माझी जात कोणती’ असा आर्त सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दरवाजा ठोठावणाºया अमृताची व्यथा ‘लोकमत’ने ‘अशा अनाथ अमृतांचे सरकार काय करणार’ या शीर्षकाखाली ९ जानेवारी रोजी मांडली आणि हा विषय ऐरणीवर आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची संवेदनशीलपणे दखल घेत १७ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनाथांना सरकारी नोकºयांमध्ये एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :reservationआरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार