- श्यामकांत पाण्डेय धारणी (अमरावती) : मेळघाटातील परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी आलेल्या राज्य विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने आपला अहवाल दिला आहे. त्याची अंमलबजावणी करीत शिक्षण विस्तार अधिकारी व आश्रमशाळा अधीक्षकांना निलंबित करण्यात आले, तर एका मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.चिखल येथील शासकीय पोस्ट बेसिक आदिवासी आश्रमशाळेतील अधीक्षक जी. डब्ल्यू. डाखोरे यांच्यावर सतत गैरहजर राहणे, वसतिगृहातील व्यवस्थापन व प्रशासनात दिरंगाई केल्याने मुलांना त्रास झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चाकर्दा येथील ज्ञानमंदिर अनुदानित आश्रमशाळेला समितीने भेट दिली असता, मुख्याध्यापक राजेंद्र गुलालकरी अनुपस्थित आढळून आले. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या शाळेत गैरप्रकार असतानाही आपल्या दौºयात सर्व काही आलबेल दाखविल्यामुळे शिक्षण विस्तार अधिकारी एस.एस. ढोके यांना निलंबित करण्यात आले आहे. मेळघाटात कुपोषणामुळे बळी जाणाºयांची संख्या दरवर्षी वाढत आहे़ याची गंभीर दखल घेत न्यायालयाने कुपोषणामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते़ त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने समिती स्थापन करून मेळघाताील परिस्थितीचा आढावा घेणे सुरू केले़अपर आदिवासी आयुक्त (एटीसी) यांच्या आदेशाने दोन अधिकाºयांचे निलंबन करण्यात आले, तर एकास शो कॉज देण्यात आली आहे. प्रसंगी प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.- विजय राठोड, प्रकल्प अधिकारी, धारणी
मेळघाटातील शिक्षण अधिकारी, आश्रमशाळा अधीक्षक निलंबित; एसटी कल्याण समितीचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:51 IST