...तर शिक्षणमंत्र्यांची झोपमोड आंदोलन!

By Admin | Updated: September 5, 2016 05:16 IST2016-09-05T05:16:14+5:302016-09-05T05:16:14+5:30

रहेजा कला महाविद्यालयावर प्रशासकीय अधिकारी नेमण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले

The education minister's sleeping movement! | ...तर शिक्षणमंत्र्यांची झोपमोड आंदोलन!

...तर शिक्षणमंत्र्यांची झोपमोड आंदोलन!


मुंबई : रहेजा कला महाविद्यालयावर प्रशासकीय अधिकारी नेमण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले, परंतु वास्तवात काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी, जर आता महाविद्यालयाने फाउंडेशन कोर्स सुरू केला नाही आणि महाविद्यालयावर प्रशासकीय अधिकारी नेमला नाही, तर शिक्षणमंत्र्यांची झोपमोड आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी भारती संघटनेने शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
गेल्या दोन महिन्यांपासून रहेजा कला महाविद्यालयातील फाउंडेशन अभ्यासक्रम सुरू करण्यासह विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या जादा फीविरोधात संघटना आक्रमक झाली आहे.
या प्रश्नावर शिक्षणमंत्री विनोद तावडे केवळ तोंडी आश्वासन देत आहेत, असा आरोप संघटनेने केला आहे. (प्रतिनिधी)
>काय आहेत मागण्या...
रहेजा स्कूलमध्ये फाउंडेशन अभ्यासक्रम सुरू झाला पाहिजे.
डिमांड ड्राफ्ट स्वरूपात घेतलेली जादा फी परत करण्यात यावी.
कला शाखेचे स्वतंत्र विद्यापीठ असावे.
अनुदानित अभ्यासक्रम कोणत्याही कारणास्तव बंद करण्यात येऊ नये.
जी.डी. आर्टच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करावी.
शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी शासकीय स्कॉलरशिप सुरू करावी.
कला शाखेच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी भारतीने शनिवारी ‘रहेजा आंदोलनाची पुढची दिशा आणि मागण्या’ या विषयावर मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी आश्वासनानुसार कार्यवाही करण्याची मागणी केली.

Web Title: The education minister's sleeping movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.