शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Education: पुढील बुधवारपासून चला कॉलेजला! ५० टक्के विद्यार्थी क्षमतेने भरणार वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 12:06 IST

College: लसीकरणाचे वाढते प्रमाण आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नाट्यगृहे, चित्रपटगृहे विश्व खुले होत आहे. आता महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.

मुंबई : लसीकरणाचे वाढते प्रमाण आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नाट्यगृहे, चित्रपटगृहे विश्व खुले होत आहे. आता महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. त्यासाठी नियम जिल्हानिहाय स्वतंत्र असतील, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.महाविद्यालये सुरू करण्याचा आदेशही बुधवारी जारी झाला. मार्च २०२० पासून बंद महाविद्यालयांची दारे आता उघडणार आहेत. विद्यापीठ/ महाविद्यालयांचे वर्ग ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने सुरू करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणांशी चर्चा करून विद्यापीठांनी निर्णय घ्यावा, असे या आदेशात म्हटले आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेले १८ वर्षे वयावरील विद्यार्थी महाविद्यालयात हजर राहू शकतील. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन अनिवार्य असेल. उपस्थित राहता न येणाऱ्यांना ऑनलाईन सुविधा मिळेल. वसतिगृहे टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यासाठी उच्च शिक्षण विभागाचे संचालक, तंत्रशिक्षण संचालक आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करतील. लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठांनी संस्थाचालक, प्राचार्य यांच्या मदतीने व जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणाची मोहीम राबवावी. विद्यापीठ, महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीही लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे. प्रतिबंधित क्षेत्रातील महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने विद्यापीठ व प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असे सरकारी आदेशात म्हटले आहे. 

मुंबई आणि परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा अद्यापही नाही. त्यामुळे २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू होणार असली तरी, त्यांना महाविद्यालयांत उपस्थित राहण्यात अडचणी येणार आहेत. या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी, अशी विनंती रेल्वे विभागाला राज्य शासनाकडून केली जाईल.- उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

टॅग्स :collegeमहाविद्यालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEducationशिक्षण