जिल्हाधिका-याला झाली शिक्षा

By Admin | Updated: January 30, 2015 03:55 IST2015-01-30T03:55:12+5:302015-01-30T03:55:12+5:30

गोसीखुर्द प्रकल्पामुळे बाधित गावांचे पुनर्वसन करताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भंडारा दिवाणी

Education of District Collector | जिल्हाधिका-याला झाली शिक्षा

जिल्हाधिका-याला झाली शिक्षा

भंडारा : गोसीखुर्द प्रकल्पामुळे बाधित गावांचे पुनर्वसन करताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भंडारा दिवाणी (वरिष्ठ स्तर) न्यायालयाने तत्कालीन जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे, उपविभागीय अधिकारी रवींद्र कुंभारे व कार्यकारी अभियंता पी.एन. वाकोडीकर यांना ३ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
गोसीखुर्द प्रकल्पामुळे बाधित झालेल्या खैरी या गावाचे अशोकनगर येथे पुनर्वसन करताना अनियमितता व कायद्याचे उल्लंघन झाले. या प्रकरणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास पडोळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने अधिकच्या संपादित जमिनीचा ताबा ४ आठवड्यांत सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाचे तत्कालीन जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी पालन केले नव्हते. त्यामुळे त्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड भरावा लागला होता. न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पडोळे यांनी पुन्हा उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्ते पडोळे यांच्या जमीन पुनर्वसनाचे काम करण्यासाठी मनाई आदेश दिले होते. या आदेशाला अधिकाऱ्यांनी न जुमानता पुनर्वसनाची कारवाई केली. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने तत्कालीन जिल्हाधिकारी सरकुंडे, उपविभागीय अधिकारी कुंभारे, कार्यकारी अभियंता वाकोडीकर यांना दोषी ठरवत ३ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Education of District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.