शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

खिडकाळी येथील एज्युकेशन हबला राज्य सरकाराचा ग्रीन सिग्नल, ठाणे होणार उच्च शिक्षणाचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 5:50 PM

येत्या काळात ठाणे शहर हे एज्युकेशन हब म्हणून ओळखले जाणार आहे. खिडकाळी येथे आरक्षण बदल्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने ग्रीन सिग्नल दिल्याने खिडकाळी येथे आता ११३ हेक्टर जमीनीवर एज्युकेशन हब साकारले जाणार आहे.

ठळक मुद्दे११३ हेक्टरवर साकारले जाणार हब२०१६ मध्ये मंजुर झाला होता महासभेत प्रस्ताव

ठाणे - मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद या शहरांच्या धर्तीवर ठाण्यातही एज्युकेशन हब निर्माण व्हावे आणि आयआयएम, आयआयटी यांच्या दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संस्था ठाण्यात याव्यात, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यानुसार आता खिडकाळी येथील ११३ हेक्टर जमिनीवरील आरक्षण बदलाला राज्य सरकारना मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे. या संदर्भात ठाणे महापालिकेने यंदाच्या २०१९-२० च्या अर्थसंकल्पातही या एज्युकेशन हबचा उल्लेख केला आहे. त्यामुळे ठाण्यात आता उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत.              उच्च शिक्षणाच्या अनेक नामांकीत संस्था राज्यात मुंबई-पुण्यात, तर देशात बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली आदी ठिकाणी आहेत. ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबईपर्यंत जावे लागते किंवा पुणे अथवा राज्याबाहेरच्या शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यास हॉस्टेलवर राहून शिक्षण पूर्ण करावे लागते. यामुळे त्यांची आबाळ होते, तसेच खर्चही वाढतो. त्यामुळेच ठाण्यात शिक्षणाच्या सर्वोत्तम संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू होते. त्यादृष्टीने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा करून खिडकाळी येथील ११३ हेक्टर क्षेत्रावर एज्युकेशन हब विकसित करण्याचा निर्णय घेऊन या जागेवरील आरक्षण बदलाबाबतचा प्रस्ताव २०१६ मध्ये महापालिकेच्या महासभेत मंजुर झाला होता.त्यानंतर राज्य सरकारकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी ९ आॅक्टोबर २०१६ रोजी महापालिकेने पाठवला. त्याला आता मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहणाचा मार्ग मोकळा झाला असून अनेक नामांकित शिक्षण संस्थांशी ठाणे महापालिका संपर्कात आहे. इनस्टिट्युट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (पूर्वीची यूडीसीटी) या संस्थेने स्वारस्य देखील दाखवले आहे. हरीत क्षेत्राऐवजी शिक्षणासाठीचे आरक्षण झाल्यामुळे जमीन अधिग्रहणात शेतकऱ्यांना देखील चांगला मोबदला मिळणार आहे.वसई-अलिबाग या मल्टिमोडल कॉरिडॉरपासून अवघ्या २ किमीवर ही जागा असून जलवाहतूक, मेट्रो मार्ग, एमएमआरडीएचे ग्रोथ सेंटर अशा विविध प्रकल्पांमुळे खिडकाळीचे हे क्षेत्र एज्युकेशन हबसाठी सर्वार्थाने योग्य असल्यानेच या जागेची निवड करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत ठाण्यात एज्युकेशन हब विकसित करण्याचे वचन दिले होते. त्याची पूर्तता करण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला असल्याचे शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाEknath Shindeएकनाथ शिंदे