कलमाडी यांना ईडीची नोटीस

By Admin | Updated: July 25, 2014 01:52 IST2014-07-25T01:52:37+5:302014-07-25T01:52:37+5:30

4 कोटी 64 लाखांच्या परदेशी चलन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रकुल खेळांच्या आयोजन समितीचे प्रमुख सुरेश कलमाडी आणि इतर सहा जणांना नोटीस बजावली आहे.

Eddie's notice to Kalmadi | कलमाडी यांना ईडीची नोटीस

कलमाडी यांना ईडीची नोटीस

नवी दिल्ली : दिल्ली राष्ट्रकुल घोटाळाप्रकरणी पाच वर्षानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज क्वीन्स बॅटन रिले कार्यक्रमात 4 कोटी 64 लाखांच्या परदेशी चलन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रकुल खेळांच्या आयोजन समितीचे प्रमुख सुरेश कलमाडी आणि इतर सहा जणांना नोटीस बजावली आहे. 
ईडीने फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट(फेमा)अंतर्गत कलमाडी, तत्कालीन सरचिटणीस ललित भानोत, तत्कालीन कोषाध्यक्ष ए. के. माटू, महासंचालक व्ही. के. वर्मा, सहमहासंचालक एम. जयचंद्रन, उपमहासंचालक संजय महिंद्रू आणि आयोजक समितीच्या अधिका:यांना कारणो दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना 3क् दिवसांत नोटिसीला उत्तर द्यायचे आहे. त्यानंतर फेमाअंतर्गत कारवाईला सुरुवात होईल. ईडीने फेमा उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Eddie's notice to Kalmadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.