शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ईडी लागली, आता तुमची सीडी दाखवा; माजी मंत्री गिरीश महाजनांचं एकनाथ खडसेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 17:37 IST

सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीनंतर गिरीश महाजन प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ठळक मुद्दे ईडी आणि सीडी वरून जळगाव जिल्ह्याचे राजकारण गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे.तपासणी व अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांनी जाहिररित्या सीडी दाखवावीभाजपा नेते गिरीश महाजन यांचे एकनाथ खडसेंना जाहीर आव्हान

जळगाव : अनेक दिवसांपासून ईडी आणि सीडी बाबत चर्चा सुरू आहेत, हा विषय आता जुना झाला आहे. मात्र, आता ईडी लागली असून त्यांनी आता सीडी दाखवावी असे आव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे(NCP Eknath Khadse) यांना दिले आहे.

सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीनंतर गिरीश महाजन प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ईडी आणि सीडी वरून जळगाव जिल्ह्याचे राजकारण गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. त्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची इडीची चौकशी सुरु असून, सीडी केव्हा लागेल याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दरम्यान, सीडी बाबत काही जणांकडून अभ्यास व तपासणी सुरू आहे. ती तपासणी व अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांनी जाहिररित्या सीडी दाखवावी असे आव्हान गिरीश महाजन(BJP Girish Mahajan) यांनी दिले आहे.

मंदिरे उघडली नाही तर आम्ही उघडू

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्यामुळे आता अनेक निर्बंध शिथिल झाले आहेत. राजकीय कार्यक्रम मोठ्या संख्येने होत आहेत, तसेच इतर राज्यांमध्ये देखील मंदिर उघडली गेली आहेत.मात्र राज्य शासनाकडून अजूनही मंदिरे उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने सोमवारी भाजप कडून मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य शासनाने आता मंदिरे उघडली नाहीत तर आम्ही ती मंदिरे उघडू असा इशारा गिरीश महाजन यांनी दिला आहे.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनeknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपा