शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडी ॲक्शन मोडमध्ये , कडक कारवाईचा पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 08:48 IST

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ईडी त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईच्या पवित्र्यात असून, न्यायालयातून अजामीनपात्र वाॅरंट मिळवणार आहे.

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात तब्बल पाचवेळा चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ईडी त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईच्या पवित्र्यात असून, न्यायालयातून अजामीनपात्र वाॅरंट मिळवणार आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.ईडीने २५ जूनपासून आतापर्यंत देशमुख यांना पाचवेळा तर मुलगा ऋषिकेश यांना दोनवेळा व पत्नी आरती यांना एकदा चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स बजावले आहे. मात्र ते एकदाही चौकशीला हजर राहिलेले नाहीत. या कारवाईविरोधात त्यांनी सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे ईडीने त्यांना व ऋषिकेश यांना बुधवारी चौकशीला हजर राहण्याबाबत सूचना केली होती. मात्र दोघांनीही तिकडे पाठ फिरवत वकिलांमार्फत पत्र दिले.देशमुख यांच्यावर कारवाई करण्यास न्यायालयाची आडकाठी नसल्याने ईडीने आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. त्याची पहिली कार्यवाही म्हणून त्यांच्याविरुद्ध न्यायालयातून अजामीनपात्र वॉरंट काढण्याचे ठरवले आहे. त्याबाबत कोर्टाकडे अर्ज करून मागणी करण्यात येणार असल्याचे ईडीतील सुत्रांनी सांगितले.

या प्रकरणात ईडीने आतापर्यंत देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. तर देशमुख यांच्या मुंबई, नवी मुंबई, नागपूर येथील मालमत्तेवर छापे टाकले आहेत. वरळीतील फ्लॅट व उरण येथील भूखंडही जप्त केला आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुख