अर्थतज्ज्ञ मुकुंद घैसास यांचे निधन
By Admin | Updated: May 30, 2016 04:45 IST2016-05-30T04:45:16+5:302016-05-30T04:45:16+5:30
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, शहर सहकारी बँकेचे संस्थापक-संचालक प्रा. मुकुंद रामचंद्र घैसास (७९) यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

अर्थतज्ज्ञ मुकुंद घैसास यांचे निधन
अहमदनगर : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, शहर सहकारी बँकेचे संस्थापक-संचालक प्रा. मुकुंद रामचंद्र घैसास (७९) यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे मुले डॉ. धनंजय, रवीकिरण आणि गिरीश घैसास, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रा. घैसास पंधरा दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पेमराज सारडा महाविद्यालयात कॉमर्स विषयाचे प्राध्यापक असलेल्या प्रा. घैसास यांनी एम. ए. (अर्थशास्त्र), एम. कॉम. आयसीएडब्ल्यू, एलएलबी या शाखांमध्ये उच्च शिक्षण घेतले. १९६५ मध्ये त्यांनी इन्स्टिट्युट आॅफ कॉमर्स संस्था स्थापन केली. सहकारी बँका, पतसंस्था यांना प्रशिक्षण देणाऱ्या यशदा, वैकुंठभाई मेहता, गोवा राज्य सहकारी संघ, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, गुजरात फेडरेशन अशा संस्थांमध्ये त्यांनी वरिष्ठ व्याख्याता म्हणून काम केले. १ जुलै १९७१ मध्ये त्यांनी शहर सहकारी बँकेची स्थापना केली. (प्रतिनिधी)