शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

आर्थिक-विकासात्मक लेखन, पत्रकारितेचा होणार सन्मान, लोकमत पां.वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 09:38 IST

स्पर्धेत संबंधित वर्षभरात मराठी भाषेतील वृत्तपत्रे, नियतकालिके व मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख व बातम्यांना पुरस्कृत केले जाते. 

वंदना धर्माधिकारी, सूर्यकांत पाठक, योगेश पांडे व बाळकृष्ण दोड्डी प्रथम

नागपूर  :

लोकमतचे प्रथम संपादक पद्मश्री पां. वा. गाडगीळ व लोकमतचे ज्येष्ठ संपादक म.य. उपाख्य बाबा दळवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, अनुक्रमे आर्थिक-विकासात्मक लेखन पत्रकारिता आणि शोधपत्रकारिता या दोन श्रेणींसाठी लोकमततर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेचे २०२१ व २०२२ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धेत संबंधित वर्षभरात मराठी भाषेतील वृत्तपत्रे, नियतकालिके व मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख व बातम्यांना पुरस्कृत केले जाते. 

२०२१ व २०२२ चे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत. (कंसात शीर्षक व वृत्तपत्राचे नाव). पां.वा. गाडगीळ आर्थिक-विकासात्मक लेखन स्पर्धा- वर्ष २०२१; प्रथम पुरस्कार- वंदना धर्माधिकारी, पुणे. (आत्मनिर्भर, साप्ताहिक अर्थशक्ती), द्वितीय पुरस्कार-विनोद धनाजी शेंडे, पुणे. (भूक निर्देशांक: घसरणीचा  विकास, लोकसत्ता). तृतीय पुरस्कार- प्रवीण घोडेस्वार, (महिला स्वच्छता कामगारांची दयनीय अवस्था, मिळून साऱ्याजणी)वर्ष २०२२; प्रथम पुरस्कार- सूर्यकांत पाठक, पुणे. (ग्राहक हक्कांना मिळणार बळकटी, ग्राहकहित). द्वितीय पुरस्कार- डॉ. प्रतिमा इंगोले, अमरावती. (शेतीचा शोध घेऊनही स्त्रीची आर्थिक कोंडी, पुण्यनगरी). तृतीय पुरस्कार- समीर मराठे, नाशिक. (ट्रक ड्रायव्हर्सच्या आयुष्यावरील लेख, ‘उस्ताद’, लोकमत).  

म.य. उपाख्य बाबा दळवी शोधपत्रकारिता स्पर्धा- वर्ष २०२१; प्रथम पुरस्कार- डॉ. योगेश प्रकाश पांडे, नागपूर (नागपुरात ‘नीट’चा घोटाळा, लोकमत). द्वितीय पुरस्कार- विश्वास पाटील, कोल्हापूर. (दामदुप्पट परताव्याचा भुलभुलैय्या, लोकमत). तृतीय पुरस्कार-विवेक भुसे, पुणे. (राज्यभर गाजलेल्या स्पर्धा परीक्षा गैरव्यवहार, लोकमत). 

वर्ष २०२२; प्रथम पुरस्कार-बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर. (शेकडो कोटींच्या ऑनलाईन घोटाळ्याचा भंडाफोड, लोकमत). द्वितीय पुरस्कार- इंदुमती सूर्यवंशी, कोल्हापूर. (जयप्रभा स्टुडिओची दोन वर्षांपूर्वीच विक्री, लोकमत). तृतीय पुरस्कार- सुमेध वाघमारे, नागपूर. (शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरचा अभाव, लोकमत) 

या पुरस्कार स्पर्धेकरिता आर्थिक-विकासात्मक लेखन गटासाठी दोन्ही वर्षांसाठी आलेल्या एकूण १०३ प्रवेशिकांमधून  ४७  प्रवेशिका स्पर्धेकरिता पात्र ठरल्या.  शोधपत्रकारिता गटासाठी आलेल्या ८६ प्रवेशिकांमधून ३६  प्रवेशिका पात्र ठरल्या. दोन्ही गटांच्या पात्र प्रवेशिकांमधून तीन-तीन विजेत्यांची निवड करण्यात आली. पुरस्कारांचे स्वरुप, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. या स्पर्धांचे परीक्षण ज्येष्ठ संपादक कमलाकर धारप व दिलीप तिखिले यांनी केले आहे. या पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याबाबतची सूचना कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर विजेत्यांना दूरध्वनीद्वारे दिली जाईल.