शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

इकोफ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 04:52 IST

इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

- जयंत धुळप अलिबाग : हराळी, उस्मानाबाद येथे आयोजित २६व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक परिषदेत रायगड जिल्ह्यातील लोधिवली येथील रिलायन्स फाउंडेशन स्कूलमधील मराठी माध्यमाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‘इकोफ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन’ या वैज्ञानिक प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. पंजाबमध्ये होणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये रिलायन्स फाउंडेशन स्कूलच्या विद्यार्थिनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.हिमानी जोशी, पूर्वा बेलगल्ली आणि केतकी लबडे यांनी हा प्रकल्प शाळेतील विज्ञान विषयाच्या प्रयोगशील शिक्षका वैष्णवी मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून सादर केला होता. सॅनिटरी नॅपकिनचे व्यवस्थापन व ते इकोफ्रेंडली करण्याबाबत आवश्यक शास्त्रीय पर्याय उपलब्ध नव्हता आणि म्हणूनच हाच वेगळ्या वाटेचा विषय विज्ञान शिक्षिका वैष्णवी मोडक यांनी विद्यार्थिनींना यावेळी मार्गदर्शन केले. सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचºयाच्या भीषणतेची जाणीव समाजाला करून देण्यासाठी, घनकचरा व्यवस्थापन व इकोफ्रेंडली पर्याय हा विषय प्रकल्पासाठी निवडला. यामध्ये त्यांंनी सर्वेक्षण, प्रयोग आणि मुलाखतीचा अवलंब केला.सर्वेक्षण परिसरातील ८१ टक्के स्त्रिया या नॅपकिन वापरतात. सरासरी एक स्त्री दिवसाला ४ नॅपकिन वापरते आणि मासिक पाळी असण्याचे सरासरी दिवस हे चार असतात. म्हणजे एक स्त्री १६ नॅपकिन एका मासिक पाळीसाठी वापरते. या प्रमाणात सॅनिटरी नॅपकिन्सचा घनकचरा मोठ्या प्रमाणात तयार होतो. त्यास त्यांनी इकोफ्रेंडली पर्याय म्हणून बांबू टॉवेलपासून बांबू नॅपकिन बनविले. बांबू हा कॉटनपेक्षा जास्त अ‍ॅब्सॉरबंट आहे, शिवाय हा आपल्याला सहज उपलब्ध होतो. त्याचबरोबर, या विद्यार्थिनींनी शाळा परिसरातील बचत गटांमध्ये जाऊन मेन्स्ट्रुल कप व डिस्ट्रॉइंग मशिनबद्दल जागृती केली.३० प्रकल्पांत उत्कृष्ट३० नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद येथे झालेल्या २६व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक राज्य परिषदेत आलेल्या एकूण ७४ वैज्ञानिक प्रकल्पांमध्ये अत्यंत खडतर अशा परीक्षणाच्या दोन फेºया यशस्वीरीत्या पार करून, राष्ट्रीय स्तराकरिता निवडलेल्या अंतिम ३० वैज्ञानिक प्रकल्पांत या प्रकल्पाने स्थान प्राप्त केले. हिमानी जोशी हिने परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना अचूक उत्तरे देऊन या अंतिम ३० प्रकल्पांत सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून स्थान प्राप्त केले. परिणामी, आता पंजाबमध्ये होणाºया इंडियन सायन्स काँग्रेस या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या प्रकल्पाची निवड झाली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यWomenमहिला