वर्सोव्यातील मंडळाने कागदाच्या लगद्यापासून साकारली इको फ्रेंडली मूर्ती

By Admin | Updated: September 8, 2016 13:24 IST2016-09-08T13:24:52+5:302016-09-08T13:24:52+5:30

वर्सोव्यातील स्वनाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पर्यावरण जागृती करून कागदाच्या लगद्यापासून आकर्षक इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारली आहे.

Eco-friendly idol made from Varsova's board of paper | वर्सोव्यातील मंडळाने कागदाच्या लगद्यापासून साकारली इको फ्रेंडली मूर्ती

वर्सोव्यातील मंडळाने कागदाच्या लगद्यापासून साकारली इको फ्रेंडली मूर्ती

मनोहर कुंभेजकर

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ८ - वर्सोवा मेट्रो स्थानकालगत असलेल्या स्वनाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,मॉडेल टाऊन,वर्सोवा यांनी यंदा पर्यावरण जागृती करून कागदाच्या लगद्यापासून आकर्षक इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारली आहे.या वर्षीचा देखावा हा आपण नवीन पिढीला काय देणार आहोत असा सवाल करत आमच्या मंडळाने पर्यावरणाचे रक्षण करा असा संदेश दिला असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आणि माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र(बाळा)आंबेरकर यांनी दिली.१९८१साली या मंडळाची स्थापना झाली.यंदा हे मंडळ आपला ३६वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असून पश्चिम उपनगरात विविध सामाजिक प्रबोधनात्मक देखावे साकारण्यात या मंडळाचा नावलौकिक असून अनेक बक्षीसे मंडळाला देखाव्यासाठी मिळाली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष राजेश ढेरे आणि सल्लागार संजीव कल्ले यांनी दिली.

येथील गणेश मूर्ती ही पृथ्वीवर उभी असून झाड कापणाऱ्या माणसाला ती थांबवत आहे.झाडे कापू नका,पर्यावरणाचे रक्षण करा असा संदेश येथील देखाव्यातून साकारण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे वाहतुकीची कोंडी,धूर प्रदूषण मोठ्याप्रमाणात होत आहे.आपण मंगळावर जातो,परंतू पृथ्वीचे रक्षण कसे करणार?जगभरात लढाई,आतंकवाद सुरु आहे,शांतता आपण येणाऱ्या नव्या पिढीला देणार आहोत का?अंटाक्रिटीका येथे बर्फ विरघळत आहे,तर उत्तराखंडात ढगफुटी होत आहे.त्याचे उदाहरण म्हणजे केदारनाथ मंदिर परिसर,सुमुद्रात सोडण्यात येणाऱ्या कारखान्यातील सांडपाणी आदी विविध विषय येथील देखाव्यातून साकारले असल्याची माहिती श्री.आंबेरकर यांनी दिली.

श्री.देवेंद्र (बाळा) आंबेरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वर्षभरात मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.यामध्ये गरीब-गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप,मोफत वैद्यकीय शिबीर,वृक्षारोपण,अपंग मुलांना सायकल आणि व्हीलचेअरचे वाटप,बालदिनानिमित्त सुमारे ३००० शालेय विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन येथील चाचा नेहरू उद्यानात करण्यात येथे अशी माहिती श्री.ढेरे आणि मंडळाचे सरचिटणीस अशोक मोरे यांनी दिली.मंडळाचे शौकत विरानी,विवेक पंगेरकर,श्रवण गायकवाड,अमेय घाग,नासीर अन्सारी,विकी गुप्ता आणि इतर कार्यकर्ते हा येथील गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.

 

Web Title: Eco-friendly idol made from Varsova's board of paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.