इस्टर्न फ्री-वेवर अपघात, दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: June 9, 2015 16:15 IST2015-06-09T16:06:24+5:302015-06-09T16:15:29+5:30
मुंबईतील इस्टर्न फ्री-वेवर आज सकाऴी पहाटेच्या सुमारास ऑडी आणि टॅक्सी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत.

इस्टर्न फ्री-वेवर अपघात, दोघांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ०९ - मुंबईतील इस्टर्न फ्री-वेवर आज पहाटे अडीजच्या सुमारास ऑडी आणि टॅक्सी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत.
इस्टर्न फ्री-वेवर भरधाव वेगात आलेल्या एका ऑडीने टॅक्सीला धडक दिली. या धडकेत टॅक्सीचा चक्काचूर झाला असून टॅक्सीतून प्रवास करणा-या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना सायन येथील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, याप्रकरणी ऑडीचालक जान्हवी गडकर हिला अटक करण्यात आली असून तिने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तिच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. जानव्ही गडकर ही पेशाने वकील असून ती उच्च न्यायालयात वकिली करते.