शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भात पूरच पूर, निम्म्या राज्यात पिके आतुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 06:01 IST

रस्ते, घरे पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत, तीन जिल्ह्यांचा संपर्क तुटला, मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तीन दिवसांपासून विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, अतिवृष्टीमुळे रविवारी गडचिरोली, चंद्रपूर व गोंदियात पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनेक पुलांवर पाणी साचल्याने महामार्ग बंद पडले. गावांचे संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले. असे असले तरी निम्म्या विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

तलाव फुटून ३०० घरांत पाणीचंद्रपूर : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा, वर्धा, अंधारी, उमा व पिंपळनेरी नद्यांना पूर आला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील मामा तलावाची पाळ फुटल्याने ३०० घरांत पाणी शिरले जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्य सुरू झाले आहे.

गडचिरोली नागपूर, चंद्रपूरशी संपर्क तुटला गडचिरोली : शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे गडचिरोलीचा नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क तुटला असून, चार राष्ट्रीय महामार्गांसह ३७ रस्त्यांची रहदारी सध्या बंद आहे. भामरागडला पुराचा सर्वाधिक फटका बसला. अनेक दुकाने आणि घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. निम्मे गडचिरोली शहरही पाण्याखाली गेले. पूर परिस्थितीमुळे २२ जुलैला जिल्ह्यातील सर्व शाळा- महाविद्यालयांना सुटी दिली आहे.

पंचगंगा नदीकाठच्या गावांची स्थलांतराची तयारी सुरू कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस आला. परिणामी पंचगंगा नदी ३७ फुटांच्या वरून वाहू लागली. पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, स्थलांतराची तयारी सुरू केली आहे, काही तालुक्यांत ढगफुटीसारखा पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील ३३ मार्ग पुरामुळे बंद आले. • रत्नागिरी जिल्ह्यातील चिंचवली (ता. खेड) येथील रामचंद्र सखाराम पवार हे गुरुवारी नदीतून वाहून गेले होते. शनिवारी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

अनेक जिल्ह्यांत अद्यापही पावसाची प्रतीक्षाचप्रादेशिक हवामान विभागाच्या पावसाच्या अहवालानुसार, अमरावती येथे १२ टक्के, तर गोंदिया जिल्ह्यात ११ टक्के पावसाची तूट आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर असला तरी अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात प्रतीक्षा कायम आहे.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या निम्मा म्हणजेच ३३७.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते २० जुलै या ५० दिवसांच्या कालावधीत ५९.६ टक्के पाऊस झाला असतानाही जिल्ह्यातील मोठी धरणे अद्याप तहानलेली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही पावसाने दडी मारल्यामुळे पिकांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहावे : मुख्यमंत्री शिंदेमुंबई : मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. इतरही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलिस, महापालिका, नगरपालिका तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. हवामान खाते, आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून वेळोवेळी माहिती घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

कृष्णेची पातळी १८ फुटांवरकाही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणीपातळी वाढ झाली. रविवारी सांगलीतील पातळी १८ फुटांवर गेली होती.कोयना धरणात ५४ टीएमसीचोवीस तासांत कोयना धरणात साडेतीन टीएमसी पाणीसाठा वाढला. त्यामुळे सध्या ५४.४३ टीएमसी पाणीसाठा झाला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर