शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साद्राबाडीच्या ३५ किमी परिघापर्यंत भूकंपाचीच कंपने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 21:13 IST

‘एनसीएन’ पथकप्रमुखांची माहिती : मध्य प्रदेशातील देडतलाईपर्यंत भूगर्भातील धक्यांची श्रृंखला

गजानन मोहोडअमरावती : भूगर्भातील हालचालीमुळे जाणवणारे धक्के व प्रचंड आवाज केवळ मेळघाटातील साद्राबाडीपर्यंत सीमित न राहता मध्यप्रदेशातील देडतलाईपर्यंत जाणवत आहे. ‘एनसीएस’चे पथकप्रमुख कुलवीरसिंग यांनी ही भूकंपाचीच कंपने असल्याचे स्पष्ट केले. साद्राबाडीपासून ३५ किमीच्या परिघात धक्के बसत असल्याने नवी दिल्ली येथील ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्रॉफ’ची चमू २५ ऑगस्टपासून ठाण मांडून आहे. २१ ऑगस्टला दिल्ली केंद्रातील सिस्मोग्राफ यंत्रात २.५ रिश्टरस्केल  नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले.धारणी तालुक्यातील साद्राबाडी, झिल्पी, खारी, गावलानडोह, सुसर्दा व राणीपिसा  या गावांमध्ये साधारणपणे दोन आठवड्यापासून भूगर्भात हालचाल होत आहे. जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेत साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनेचे नेमके कारण व शास्त्रीयदृष्ट्या तपासासाठी ‘जीएसआय’ (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) व  एनसीएस (नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्राफ) च्या पथकास पाचारण केले. राष्ट्रीय स्तरावरील दिल्ली येथील ‘एनसीएस’ या संस्थेच्या तज्ज्ञांचे पथक साद्राबाडीला २४ ऑगस्टपासून ठाण मांडून आहेत. या पथकाद्वारा तीन ठिकाणी ‘सिस्मोग्रॉफ’ यंत्र बसविण्यात आले व या यंत्राद्वारे नोंदी ठेवण्यात येत आहेत. यामध्ये साद्राबाडी येथील धक्के भूकंपाचेच असल्याचे स्पष्ट झाले. 

तिव्रता कमी होतेयसाद्राबार्डी व परिसरात २१ ऑगस्टला २.५ रिश्टरस्केलपर्यंत भूकंपाची नोंद झाली. त्यानंतर या धक्क्याची तीव्रता कमी होत आहे. चार दिवसांपूर्वी १.५ रिश्टरस्केल, तर बुधवारी सकाळी १.२ रिश्टरस्केलपर्यंत याची नोंद साद्राबाडी येथे बसविलेल्या सिस्मोग्रॉफ यंत्रावर नोंद झाली. या धक्क्यांची तीव्रता दिवसेंदिवस कमी होत असल्याने घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

वरिष्ठ शास्त्रज्ञांशी चर्चेनंतर अहवालसाद्राबाडीतील सिस्मोग्रॉफ यंत्राच्या नोंदीची माहिती ‘एनसीएस’चे विभागप्रमुखांना सादर करण्यात येईल. या नोंदीच्या आधारे वरिष्ठ शास्त्रज्ञांशी चर्चा होईल. यामधून निष्कर्ष येईल त्याचा अहवाल अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल. याला किती अवधी लागेल हे नेमके आता सांगता येणार नसल्याचे बलवीरसिंह यांनी सांगितले.

 धोकादायक घरांना लाल मार्किंगसाद्राबार्डीत आता स्थिती पुर्ववत झालेली आहे. नागरिक दैनंदिन व्यवहार करू लागले आहेत. विद्यार्थी देखील शाळेत जात आहेत झिल्पी व गावलानडोह येथे प्रत्येकी एक वॉटरप्रुफ तंबू उभारण्यात आलेला आहे. धक्क्यांमुळे ज्या घरांना भेगा पडल्या व धोका आहे. अशा घरांचा सर्वे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा करण्यात आला. धोकादायक घरांना लाल मार्कींग करण्यात आले, त्या घरांमध्ये नागरिकांना रात्री राहण्यास मज्जाव केला जात असल्याचे तहसीलदार आदिनाथ गांजरे यांनी सांगितले.

टॅग्स :EarthquakeभूकंपVidarbhaविदर्भ