कोयना धरण परिसराला 4.4 स्केल भूकंपाचा धक्का !
By Admin | Updated: May 18, 2016 20:34 IST2016-05-18T20:34:39+5:302016-05-18T20:34:39+5:30
कोयना धरणाच्या क्षेत्रात आज सायंकाळीच्या सुमारास 4.4 रि. स्केलचा भुकंपचा सौम्य धक्का बसला. धरणापासून 11. 2 किलोमीटर अंतरावर भूगर्भाच्या 9 किलोमीटर आत या भूकंपाचा केंद्रबिंदू होता

कोयना धरण परिसराला 4.4 स्केल भूकंपाचा धक्का !
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 18 :- पाटण तालुक्यातील कोयना धरणाच्या क्षेत्रात आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 4.4 रि. स्केलचा भुकंपचा सौम्य धक्का बसला. धरणापासून 11. 2 किलोमीटर अंतरावर भूगर्भाच्या 9 किलोमीटर आत या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सातारा, सांगली, कोल्हापूर अन रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागाला हा धक्का जाणवला.
कोयना परिसरात नेहमीच भूकंपाचे धक्के बसत असले तरी 4 स्केलची संख्या मात्र कमी आहे. आजच्या भूकंपामुळे पाटण परिसरातील अनेक घरांची तावदाने धडधडली.