बालवाडी शिक्षिकांचे उपोषण अखेर मागे
By Admin | Updated: March 30, 2015 02:27 IST2015-03-30T02:27:38+5:302015-03-30T02:27:38+5:30
प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांच्यासोबत बैठक घेऊ, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे लेखी पत्र मिळाल्यानंतर बालवाडी

बालवाडी शिक्षिकांचे उपोषण अखेर मागे
कोल्हापूर : प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांच्यासोबत बैठक घेऊ, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यांचे लेखी पत्र मिळाल्यानंतर बालवाडी शिक्षिकांनी रविवारी सातव्या दिवशी त्यांचे उपोषण मागे घेतले. या वेळी खासदार
धनंजय महाडिक व भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी उपोषणकर्त्यांना नारळपाणी दिले.
बालवाडी शिक्षिका, सेविकांना वेतन मिळावे, विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा, या प्रमुख मागणीसाठी २३ मार्चपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४० शिक्षिकांनी आमरण उपोषण सुरू केले होते.
महाराष्ट्र राज्य बालवाडी शिक्षिका, सेविका महासंघाच्यावतीने हे आंदोलन सुरू होेते. उपोषणादरम्यान सोळा शिक्षिकांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते; पण
सर्व शिक्षिकांनी डिस्चार्ज घेऊन
पुन्हा उपोषणास सुरुवात केली होती. (प्रतिनिधी)