अपंगांनाही मिळणार रेल्वेचे ई-तिकीट
By Admin | Updated: July 18, 2014 01:12 IST2014-07-18T01:12:12+5:302014-07-18T01:12:12+5:30
अपंग व्यक्तीसुद्धा आता रेल्वेचे आॅनलाईन तिकीट (ई-तिकीट) स्वत: घेऊ शकतील. यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने एक विशेष सॉफ्टवेअर विकसित केले आहे. दिल्लीमध्ये या सॉफ्टवेअरची

अपंगांनाही मिळणार रेल्वेचे ई-तिकीट
विशेष सॉफ्टवेअर विकसित : आयआरसीटीसीचा पुढाकार
आनंद शर्मा - नागपूर
अपंग व्यक्तीसुद्धा आता रेल्वेचे आॅनलाईन तिकीट (ई-तिकीट) स्वत: घेऊ शकतील. यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने एक विशेष सॉफ्टवेअर विकसित केले आहे. दिल्लीमध्ये या सॉफ्टवेअरची तपासणी केली जात आहे. येत्या १५ दिवसात हे सॉफ्टवेअर भारतीय रेल्वेच्या हवाली केले जाईल. त्यानंतर रेल्वेतर्फे अपंग प्रवाशांना ई-तिकिटांची सुविधा उपलब्ध केली जाईल.
अपंग रेल्वे प्रवाशांसाठी सध्या आरक्षण कार्यालयात विशेष काऊंटर तयार करण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी रेल्वेमध्ये विशेष बोगीसुद्धा जोडण्यात आलेली आहे. परंतु ई-तिकिटांबाबत मात्र भेदभाव केला जात होता. ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य प्रवाशांना ई-तिकिट उपलब्ध करून दिले जाते. परंतु अपंग प्रवाशांना मात्र ही सुविधा अजूनपर्यंत मिळालेली नाही.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर टाकण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अपंग व्यक्तींना ई-तिकीट जारी करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे अपंगांना शारीरिक त्रास सहन करावा लागतो. अपंग आणि अंध प्रवाशांना रेल्वे प्रवासात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. याचा लाभ घेण्यासाठी त्यांना अपंगांसंबंधीचे प्रमाणपत्र आरक्षण काऊंटरवर कार्यरत रेल्वे कर्मचाऱ्यास दाखवावे लागते. माहितीनुसार अपंगांचे प्रमाणपत्र आता नवीन ‘फॉर्मेट’नुसार सादर करावे लागते. त्यानंतरच त्यांना सवलतीचा लाभ घेता येतो. यासाठी अपंगांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. बहुतांश वेळा अपंगांचे आरक्षण तिकीट घेण्यासाठी त्यांचे नातलगच आरक्षण कार्यालयात येतात. त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.