औषधांसाठी ई-पोर्टल अव्यवहार्य : जगन्नाथ शिंदे

By Admin | Updated: April 28, 2017 02:57 IST2017-04-28T02:57:49+5:302017-04-28T02:57:49+5:30

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने औषध विक्रीवर नियमनासाठी पुढे आणलेला ई-पोर्टलचा प

The e-portal for medicines is impractical: Jagannath Shinde | औषधांसाठी ई-पोर्टल अव्यवहार्य : जगन्नाथ शिंदे

औषधांसाठी ई-पोर्टल अव्यवहार्य : जगन्नाथ शिंदे

मुंबई : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने औषध विक्रीवर नियमनासाठी पुढे आणलेला ई-पोर्टलचा पर्याय अखिल भारतीय औषध विक्रेता संघाने फेटाळला आहे. औषधांसारख्या संवेदनशील घटकांसाठी ई-पोर्टल अव्यवहार्य असल्याचे संघाने म्हटले आहे. या पोर्टलवर नियमित माहिती भरणे हे विक्रेत्यांसाठी त्रासाचे ठरणार आहे. त्यातून औषधांची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी भीती संघाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केली. केंद्र शासनाने गेल्या महिन्यात जारी केलेला सार्वजनिक सुचना व त्यामधील तरतुदीमुळे ८ लाख औषधी व्यापारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या दीड कोटी लोकांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे, असेही शिंदे म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: The e-portal for medicines is impractical: Jagannath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.