महाराष्ट्रात ई लॉकर सेवा

By Admin | Updated: November 17, 2014 15:30 IST2014-11-17T13:20:04+5:302014-11-17T15:30:39+5:30

महाराष्ट्र सरकारने महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी ई लॉकर ही योजना सुरु केली असून या योजनेमुळे आता पदवी, जात प्रमाणपत्र, जन्म दाखला अशी महत्त्वाची कागदपत्र स्कॅन करुन ई लॉकरमध्ये सुरक्षित ठेवता येतील.

E-Locker Service in Maharashtra | महाराष्ट्रात ई लॉकर सेवा

महाराष्ट्रात ई लॉकर सेवा

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १७ - महाराष्ट्र सरकारने महत्त्वाची कागदपत्रांसाठी ई लॉकर ही योजना सुरु केली आहे. आधार कार्डशी संलग्न असलेल्या या योजनेमुळे आता पदवी, जात प्रमाणपत्र, जन्म दाखला अशी महत्त्वाची कागदपत्र स्कॅन करुन ई लॉकरमध्ये सुरक्षित ठेवता येतील. 
ई गव्हर्नन्समध्ये महाराष्ट्राने नेहमीच नवनवीन उपक्रम राबवले असून आता ई गव्हर्नन्स या योजनेद्वारे महाराष्ट्र तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. ई लॉकर ही सुविधा आधार कार्डशी संलग्न असल्याचे राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अधिका-यांनी सांगितले. महा डिजीटल लॉकर्समध्ये शिक्षण, संपत्ती तसेच सरकारी प्रमाणमपत्र ठेवणे शक्य होणार असून भविष्यात लोकांना प्रत्येक ठिकाणी ही कागदपत्र घेऊन फिरावं लागणार नाही. ज्या कंपनीला त्यांच्या कर्मचा-याची कागदपत्रं हवी असतील ते आमच्याशी संपर्क करुन ती माहिती घेऊ शकतात असेही या अधिका-यांनी सांगितले. ही कागदपत्रं आमच्या ई लॉकर्समध्ये सुरक्षित राहतील व त्याचा अन्य व्यक्ती गैरवापरही करु शकणार नाही असे आश्वासनही अधिका-यांनी दिले आहे.    
 

Web Title: E-Locker Service in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.