शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळावर मिळणार ई-बोर्डिंग पास : देशातील पहिला प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 18:35 IST

दोन्ही ठिकाणी ई-गेट बसविले जाणार असून पासवरील बारकोड स्कॅन केल्यानंतरच या गेटमधून प्रवांशाना प्रवेश मिळेल.

ठळक मुद्देपाच ई-गेटमधून सुरक्षा कक्षात मिळणार प्रवेश मागील काही वर्षांपासून पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वेगाने वाढबनावट तिकीटाच्या आधारे प्रवास करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी ही यंत्रणा फायदेशीर ठरणार

पुणे : विमानतळावर प्रवाशांना सुरक्षा कक्ष (सिक्युरिटी एरिया) व बोर्डिंग एरियामध्ये प्रवेशासाठी आता ई-बोर्डिंग पास मिळणार आहेत. दोन्ही ठिकाणी ई-गेट बसविले जाणार असून पासवरील बारकोड स्कॅन केल्यानंतरच या गेटमधून प्रवांशाना प्रवेश मिळेल. प्रायोगिक तत्वावर देशात पहिल्यांदा हा प्रयोग पुणेविमानतळावर राबविला जाणार आहे. याबाबत विमानतळ संचालक अजय कुमार यांनी दुजोरा दिला.मागील काही वर्षांपासून पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगाने वाढत आहे. पुढील काही महिन्यांत हा आकडा वार्षिक १ कोटीच्या पुढे जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांसाठी आवश्यक सोयी-सुविधा वाढविण्यासाठीही विमानतळ प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा डिजिटल माध्यमातून देण्यासाठी पावले टाकली जात आहेत. याअंतर्गत आता ई-बोर्डिंग पासची चाचणी घेण्यासाठी दि ब्युरो ऑफ सिव्ही अव्हीएशन (बीसीएएस) ने मान्यता दिली आहे. देशात पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर पुणे विमानतळावर याची चाचणी घेतली जाणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील ४५ दिवस चाचणी सुरू राहील. याचा अहवाल ह्यबीसीएएसह्णला सादर केल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. बनावट तिकीटाच्या आधारे प्रवास करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी ही यंत्रणा फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला (सीआयएसएफ)वरील ताणही कमी होणार आहे.विमानतळावरील सुरक्षा कक्षाकडे जाणाऱ्या मार्गावर तीन तर बोर्डिंग एरियाकडे जाणाऱ्या मार्गावर दोन ई-गेट बसविले जातील. प्रवाशांना ई-बोर्डिंग पास मिळाल्यानंतर सुरूवातीला सुरक्षा कक्षाआधी या गेटवर पासवरील बारकोड स्कॅन केला जाईल. हा बारकोड योग्य असल्यास गेट उघडले जाईल. त्याचप्रमाणे सर्व सुरक्षा तपासणी झाल्यानंतर बोर्डिंग एरियाकडे जातानाही हीच प्रक्रिया केली जाईल. बारकोडमध्ये प्रवाशाची संपुर्ण माहिती असेल. सध्या सीआयएसएफला सर्व प्रवाशांचे बोर्डिंग पास बारकाईने तपासावे लागतात. आता बारकोड स्कॅन झाले की आपोआप गेट उघडले जाईल. त्यामुळे याठिकाणी प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. -----------विमानतळ संचालक अजय कुमार यांनीही ई-गेटच्या प्रयोगाला दुजोरा दिला. देशात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जाणार आहे. याबाबची प्रक्रिया सुरू असून लवकरच याबाबतची माहिती प्रसिध्द केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळ