अठरा दिवसांच्या बालकाचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: May 12, 2014 02:44 IST2014-05-11T18:35:58+5:302014-05-12T02:44:00+5:30
सकाळी आईचे दुध पिऊन झोपलेल्या अवघ्या अठरा दिवसांचा चिमुरड्याने नंतर डोळेच उघडले नसल्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला.

अठरा दिवसांच्या बालकाचा संशयास्पद मृत्यू
मुंबई : सकाळी आईचे दुध पिऊन झोपलेल्या अवघ्या अठरा दिवसांचा चिमुरड्याने नंतर डोळेच उघडले नसल्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला. आकाश मनोज परिहार असे मुलाचे नाव असून मुलुंड पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
आकाशचे वडील मनोज परिहार हे वॉचमन असून आई गृहिणी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आईचे दुध प्यायल्यानंतर आकाशने उलटी केली होती. त्यानंतर तासाभरानंतर त्याच्या नाकातोंडातून रक्त येत असल्याचे आईला दिसले. त्यामुळे घाबरलेल्या आकाशच्या आईने पतीला बोलावून घेत दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आकाशला मुलुंडच्या अग्रवाल सर्वसाधारण रूग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच तो मृत झाल्याचे घोषित केले. आकाशच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदनासाठी आकाशचा मृतदेह राजावाडी रु ग्णालयात पाठविण्यात आला आहे.