पाण्याच्या हौदात बुडून चिमुकलीचा मृत्यू

By Admin | Updated: May 9, 2016 02:23 IST2016-05-09T02:23:51+5:302016-05-09T02:23:51+5:30

मलकापूर तालुक्यातील घटना.

Dying of water in the water capsules | पाण्याच्या हौदात बुडून चिमुकलीचा मृत्यू

पाण्याच्या हौदात बुडून चिमुकलीचा मृत्यू

मलकापूर (जि. बुलडाणा) : पाण्याच्या हौदात बुडाल्याने एका ३ वर्षीय चिमुकलीचा करुन अंत झाला. ही घटना लि.भो. चांडक विद्यालयामागील डवले लेआऊट मध्ये सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. आशीष जसवाणी यांची आरोही नामक ३ वर्षीय चिमुकली हातात पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन खेळण्याकरिता दुपारी ४:३0 वाजेच्या सुमारास घरातून बाहेर गेली होती. दरम्यान बराच वेळ झाला तरी आरोही घरी न परतल्याने तिचा शोध सुरु झाला. खेळता खेळता ती घरासमोरील शेजार्‍याच्या पाण्याच्या हौदात पडली असावी म्हणून हौदाकडे कुटुंबियांनी धाव घेतली. त्यावेळी आरोही मृतावस्थेत हौदात आढळून आली. वृत्त हाती येईपर्यंत या प्रकरणी शहर पोलिस स्टेशन ला कसलीही नोंद झाली नव्हती.

Web Title: Dying of water in the water capsules