तुंगार्ली धरणात बुडून युवकाचा मृत्यु
By Admin | Updated: October 22, 2016 19:12 IST2016-10-22T19:12:36+5:302016-10-22T19:12:36+5:30
पोहताना दमछाक झाल्याने मुंबईतील तरुणाचा तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू झाला आहे. तरुण मुंबईतील चेंबूरचा रहिवासी होता

तुंगार्ली धरणात बुडून युवकाचा मृत्यु
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 22 - पोहताना दमछाक झाल्याने मुंबईतील तरुणाचा तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू झाला आहे. तरुण मुंबईतील चेंबूरचा रहिवासी होता. शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभिषेक भगत (वय 22 चेंबूर, मुंबई) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शिवदुर्ग रेस्कू टीमचे सदस्य अजय राऊत , महेश म्हसने, विकास मावकर , राहुल अंभोरे , अनुराग यादव, अजय शेलार, समीर जोशी, अमोल परचंड, गणेश गीद, राजु हिरवे यांनी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अभिषेकचा मृतदेह शोधून बाहेर काढला. अभिषेक त्याच्या इतर चार मित्र मैत्रीणींसोबत लोणावळ्यात फिरायला आला होता. तो सध्या पुण्यातील हिंजवडी येथे एका कंपनीत कामाला होता.