शिरोता धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: March 6, 2017 00:46 IST2017-03-06T00:46:17+5:302017-03-06T00:46:17+5:30
नाणे मावळात ठाणे, नवी मुंबईवरून फिरण्यासाठी आलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा शिरोता धरणात पोहताना दम लागल्याने बुडून मृत्यू झाला.

शिरोता धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
कामशेत : नाणे मावळात ठाणे, नवी मुंबईवरून फिरण्यासाठी आलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा शिरोता धरणात पोहताना दम लागल्याने बुडून मृत्यू झाला.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ४) अभिजित भगवान पाटील (रा. घोडबंदर, ठाणे) व निखिल दादू पाटोळे (वय २७, रा. हलघर, नवी मुंबई) हे दोघेजण फिरण्यासाठी नाणे मावळात आले होते. तेव्हा खांडशी हद्दीत शिरोता धरणात पोहताना निखिल पाटोळे याला दम लागून तो पाण्यात बुडाला. अभिजित याने पोलिसांना खबर करून ग्रामस्थांच्या मदतीने निखिलला धरणाच्या पाण्यातून बाहेर काढले. पण त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
दरम्यान शिरोता
धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा
एकदा ऐरणीवर आला आहे. त्याठिकाणी तातडीने सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर)