तलावात बुडून दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: October 3, 2016 03:02 IST2016-10-03T03:02:32+5:302016-10-03T03:02:32+5:30

भीमनगर येथील खदान तलावात बुडून दोघा मुलांचा मृत्यू झाला आहे.

Dying in a lake, both die | तलावात बुडून दोघांचा मृत्यू

तलावात बुडून दोघांचा मृत्यू


नवी मुंबई : भीमनगर येथील खदान तलावात बुडून दोघा मुलांचा मृत्यू झाला आहे. तलावात पोहत असताना खोलीचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रबाळे एमआयसीसी येथील भीमनगर परिसरात शनिवारी दुपारी ही घटना घडली. दुर्गामाता मंदिरालगतच्या खदान तलावाच्या शेजारी परिसरातील काही मुले खेळत होती, तर त्यापैकी काही मुले पोहण्यासाठी खदान तलावात उतरली होती. यावेळी तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा बुडून मृत्यू झाला. मनीषकुमार जैसवार (१३) व निखील बिंद (०९) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Dying in a lake, both die