एक लाखाचा मागितला हुंडा, विवाहितेने केली आत्महत्या
By Admin | Updated: April 28, 2017 17:24 IST2017-04-28T17:23:51+5:302017-04-28T17:24:26+5:30
हुंडा हा विषय रूढार्थाने चावून चोथा झालेला विषय असला तरी आज 21व्या शतकातही भारतीय समाजाला पोखरणारी सर्वात ज्वलंत समस्या ठरला आहे

एक लाखाचा मागितला हुंडा, विवाहितेने केली आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 28 - हुंडा हा विषय रूढार्थाने चावून चोथा झालेला विषय असला तरी आज 21व्या शतकातही भारतीय समाजाला पोखरणारी सर्वात ज्वलंत समस्या ठरला आहे. सोलापूरमध्ये हुंडाबळीचे प्रकरण समोर आले आहे. कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणून सासरचे सतत तगादा लावत होते म्हणून एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. गृहकर्जाचा हप्ता फेडण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेवर सासरच्यांनी दबाव आणल्याचा आरोप आहे.
एबीपी न्युजच्या वृत्तानुसार, सोलापुर येथील मोहोळमध्ये हुंड्याच्या जाचाला कंटाळून शहनाज मुलाणी या विवाहितेने आत्महत्या केली आहे. शहनाज मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम गावची रहिवासी होती. 5 मे 2015 रोजी सोलापूरमधील बार्शीतल्या शकील मुलाणीसोबत तिचा विवाह झाला होता. कळसेनगरात नांदायला आलेल्या शहनाजचा पैशांसाठी छळ होत असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे.
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी मोहोळ पोलिसात 8 दिवसांनी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी शहनाजकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. या जाचाला कंटाळून 19 एप्रिलला शहनाजने स्वतःला पेटवून घेतलं. 20 तारखेला तिचा मृत्यू झाला. चौकशीनंतर मोहोळ पोलिसांनी पती शकील मुलाणीसह सासू, सासरे आणि दीरावर गुन्हा दाखल केला आहे