यवतमाळ - विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी भाजपाचे उमेदवार सुमित बाजोरिया यांचा पराभव केला आहे. विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 31 जानेवारी रोजी 100 टक्के मतदान झाले होते. यवतमाळ विधानपरिषद पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांना पहिल्या पसंतीची 298 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार सुमित बाजोरिया यांना 185 मते मिळाली. विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निडणुकीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी आणि भाजपचे सुमित बाजोरिया यांच्यात ही थेट लढत झाली होती.
महाविकास आघाडीचा भाजपाला दे धक्का, यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत दुष्यंत चतुर्वेदी विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 10:42 IST